संग्रहित फोटो
कराड : कुंटणखान्यावर छापा टाकून पोलिसांनी दोन पिडीत महिलांची सुटका केली आहे. ओगलेवाडी (ता. कराड) येथील सम्राट लॉजवर शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी कारवाई केली. दोन महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू होता. याप्रकरणी कुंटनखाना चालवणाऱ्या एका महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. लॉजचा मालक साईराज पाटील, व्यवस्थापक विशाल विलास अवधूत, रुमबॉय मुसा मुबारक जामादार, महिला एजंट शहनाज इक्बाज मुलाणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसातून अधिक मिळालेली माहिती अशी, ओगलेवाडी येथील सम्राट लॉज येथे कुंटनखाना सुरू असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार तोतया ग्राहक पाठवून पोलिसांनी त्याची खात्री केली. यावेळी तेथे महिला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपाधीक्षक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळी, शितल माने, फौजदार अशोक वाडकर, हवालदार महेश शिंदे, प्रवीण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी, मयुर देशमुख यांच्या पथकाने वॉच ठेवला होता.
सोमवारी सायंकाळी छापा टाकण्यात आला. त्यावेळी तेथे हॉटेल व्यवस्थापक व महिला एजंट सापडले. त्यांनी त्यांच्या मार्फत महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे आढळले. त्यात दोन महिलांची पोलिसांनी सुटका केली. पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. त्यामध्ये साईराज पाटील, विशाल अवधूत, मुसा जामादार, महिला एजंट शहनाज मुलाणी यांच्यावर कारवाई सुरू आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख व अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या सुचनेनुसार पोलिसांनी कारवाई केली.
हे सुद्धा वाचा : नाना पटोलेंचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाले, मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी…
पोलिसांकडून तरुणींची सुटका
पुण्यात व्यवसायावर मोठ्या प्रमाणात कारवाई होताना दिसत आहे. पुणे पोलीस देखील व्यवसाय रोखण्यासाठी कठोर पावले उचलताना दिसत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुण्यात नोकरीच्या आमिष दाखवत तरुणींना पुण्यात आणून त्यांना वेश्या व्यवसायाला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात छापा कारवाई करून तब्बल अशा ५ तरुणींची सुटका केली आहे. ५ पैकी दोन तरुणींना त्यांच्याच पतीने पुण्यात आणून वेश्या व्यवसायाला लावल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
तसेच गेल्या काही दिवसाखाली मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकून पर्दाफाश केला. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केला आहे. लोकेश राजकुमार पुरी (वय २३, रा. चौधरी वस्ती, खराडी) असे गु्न्हा दाखल केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील सहायक फौजदार छाया जाधव यांनी खराडी (चंदननगर) पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.