• अवैध संबंधाला विरोध केल्याने हल्ला
• पत्नी, प्रियकर आणि घरमालकाचा सहभाग
• पती गंभीर जखमी; पोलिसांकडून गुन्हा दाखल
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवैध प्रेमसंबंधाला विरोध केल्याने पत्नीने तिच्या प्रियकर आणि घरमालकासोबत मिळून पतीवर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. पीडित पतीच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या पतीवर एसएन एमर्जन्सीमध्ये उपचार सुरु आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथील आहे.
माळशिरसमधील ‘त्या’ तरुणीच्या खूनप्रकरणी मोठी अपडेट; जेजुरी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
काय घडलं नेमकं?
पीडित व्यतीचा नाव निलेश असे आहे. निलेश हा साकियात पोलीस ठाणे परिसरात मुबारकपूर गावाचा रहिवासी आहे. सितंदरा परिसरात एका बुटाच्या कारखान्यात तो नोकरी करतो. तो आपल्या पत्नी वनिता सोबत विहिरीजवळ एका खोलीत भाडेतत्वावर राहत होते. गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याची पत्नी वनिता, तिचा प्रियकर टिंकू आणि घरमालक यांनी मिळून त्याच्या घराशेजारी हल्ला केला. तिघांनी मिळून त्यांच्या गुप्तांगावर चाकूने वार केले, ज्यात निलेश गंभीर जखमी झाला. त्यांनतर आरोपी घटनास्थळावरून रक्तात माखलेल्या अवस्थेत पळून गेला. असे पीडित निलेशने तक्रारीत म्हंटल आहे.
पोलीस तपास सुरुa
पोलिसांनी निलेशला एसएन आपत्कालीन विभागात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असून डॉक्टरांनी त्याला धोक्याबाहेर असल्याचे सांगितले. अशातच पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
ईदीच्या 1500 रुपयांवरून वाद; पतीने पत्नी-मुलांना विष दिले, त्यांनतर स्वतः…
उत्तरप्रदेश येथील मुजफ्फरनगरमध्ये हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १५०० रुपयांच्या ईडीवरून झालेल्या वादात संपूर्ण कुटुंबाचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेव्हा शेजाऱ्यांनी दार तोडून पहिले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. तीन मृतदेह जमिनीवर पडलेले आढळले तर एक मृतदे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी ३१ मार्च रोजी मुजफ्फरनगर येथील सरवट भागातून समोर आली आहे.
Nagpur Crime: लालसेचा कळस! विद्यार्थ्यांनी व्यापाऱ्याची हत्या करून कार लंपास; 12 तासात हत्येचा उलगडा
Ans: अवैध प्रेमसंबंधाला विरोध केल्याने हल्ला झाला.
Ans: पत्नी, तिचा प्रियकर आणि घरमालक सहभागी होते.
Ans: तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






