• गुंगीचं औषध देऊन हॉटेलमध्ये अत्याचार केल्याचा आरोप
• व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल व धर्मांतरासाठी दबाव
• पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला
उत्तर प्रदेशातील: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढाच नाहीतर तिच्यावर धर्म परिवर्तनाचा दबाव आणण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी जनसेवा केंद्र मोहम्मद फराजला अटक करण्यात आले आहे. ही घटना उत्तरप्रदेश येथील जानकीपुरम ठाणे परिसरात घडली आहे.
काय नेमकं प्रकरण?
आरोपी आणि तरुणीची शाळेपासून ओळख होती. आरोपीने तरुणीशी अधिक जवळीकता वाढवली आणि आपल्या जाळ्यात ओढलं. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी मोहम्मद फराज तरुणीला जानकीपुरम येथील 60 फूटाच्या रोडवरील एका हॉटेलात घेऊन गेला, त्याने तिला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक शोषण केलं. त्यांनतर आरोपीने एक व्हिडीओ देखील बनवल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि नंतर तरुणीचे शोषण सुरूच ठेवले. आरोपीने तिच्यावर त्याच्या मित्रांशी आणि भावाशी संबंध ठेवण्यासाठी देखील दबाव टाकण्यात आल्याचे आरोप पीडितेने केला आहे.
Mumbai Crime: शरीरसुख नाकारलं…आणि थेट हत्या! Mira Road मध्ये अभिनेत्याने मोलकरणीचा जीव घेतला
पोलिसांना तक्रार दाखल केली तर…
जर तिने धर्म स्वीकारला तर तो तिच्याशी विवाह करेल. तसेच, तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती, , नंतर तिचा मानसिक छळ केला होता. एवढेच नाही तर 22 मार्च रोजी त्याने संबंधित व्हिडिओ मुलीच्या वडिलांना आणि ओळखीच्या लोकांना पाठवला, नंतर त्याने स्क्रीनशॉट काढून ते डिलिट केले. पीडितेला धमकी दिली की, जर तिने पोलिसांना तक्रार दाखल केल्यास तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ठार मारले.
आरोपी अटकेत
तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुरुवारी एफआरआय दाखल करत शुक्रवारी सलीम तिराहजवळून आरोपी मोह म्मद फराजला अटक केली.सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत असून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
Ans: लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी जवळीक वाढवली.
Ans: व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत धर्मांतरासाठी दबाव टाकला.
Ans: तक्रारीनंतर आरोपीला अटक करून तपास सुरू केला.






