Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: प्रयागराजमध्ये करोडपती कुटुंबातील चौघांचे संशयास्पद मृत्यू, भिंतीवर ‘सुनेने मारले आहे’; थरारक प्रकरण!

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे एका करोडपती कुटुंबातील चार सदस्यांचे संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घराच्या भिंतीवर ‘सुनेने मारले आहे’ असा मजकूर लिहिलेला आढळला असून पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. फॉरेन्सिक आणि सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 03, 2026 | 01:26 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • प्रयागराजमध्ये एका कुटुंबातील चार जणांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले.
  • घराच्या भिंतीवर ‘सुनेने मारले आहे’ असा मजकूर लिहिलेला सापडला.
  • पोलिसांनी हत्येचा संशय व्यक्त करत तपासाची गती वाढवली आहे.
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक थरारक घटना समोर आली आहे. एका करोडपती कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याचे समोर आले आहे. एका घरात तिघांचे मृतदेह आढळून आले. एवढेच नाही तर भिंतीवर सुनेने मारले असे लिहिलेले आदळून आले आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

काय नेमकं प्रकरण?

मंगळवारी घराचे प्रमुख ७० वर्षीय रवींद्र कुमार वैश्य, त्यांची ६५ वर्षीय पत्नी अनिता आणि ४५ वर्षीय मुलगी मीनाक्षी या तिघांचे मृतदेह घरात आढळून आले होते. तर घरातील ४० वर्षीय मुलगा अभिषेक हा बेपत्ता होता. मात्र पोलीस तपास केले असता उशिरा संध्याकाळी त्यांचा देखील मृतदेह आढळून आला. मृत अभिषेकचा मृतदेह या कुटुंबाच्या मालकीच्याच एका दुकानात आढळून आला. वीरेंद्र कुमार वैश्य यांच्याच एका नातेवाईकाने या मृतदेहाची ओळख पटवली आहे. अभिषेकचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असून तो कुजलेल्या अवस्थेत तसेच फुगलेला होता. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

Solapur Crime: मी तुला आझाद करतोय…; पत्नीसाठी शेवटचा व्हिडीओ बनवत 38 वर्षीय पतीची आत्महत्या

भिंतीवर काय?

पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली तेव्हा घराच्या भिंतीवर आणि एका बोर्डावर ‘बंटी-बबली’ आणि ‘सुनेने मारले आहे’ असे लिहिलेले आढळून आले. मृतदेहांच्या अंगावरील जखमांच्या खुणा आढळून आले. मृतदेहांची अवस्था पाहता एखाद्या जड वस्तूने डोक्यावर किंवा शरीरावर प्रहार करून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी आता हा आत्महत्येचा नसून हत्येचा गुन्हा असावा या दृष्टीने तपास तीव्र केला आहे. पोलिसांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे फील्ड युनिट, डॉग स्क्वाड आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.

दुसरा मुलगा तुरुंगात

प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मृत वीरेंद्र कुमार वैश्य यांचा दुसरा मुलगा अश्विनी वैश्य हा सध्या एका जुन्या फसवणुकीच्या गुन्ह्यात कौशांबी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पोलिसांकडून आता अश्विनीच्या पत्नीबद्दल (सुनेबद्दल) अधिक माहिती गोळा केली जात आहे. अश्विनी आणि मृत अभिषेक हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते आणि त्यांचे वडिलांशी सतत वाद होत असत. विशेष म्हणजे, ज्या घरात आणि दुकानात हे मृतदेह सापडले, त्यांना बाहेरून कुलूप लावलेले होते. पोलिसांनी हे कुलूप तोडूनच आत प्रवेश केला होता. आता या प्रकरणात काय नेमकं समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Mira Bhayandar Crime : चार वर्षीय मुलाच्या मृत्यूचे गूढ उलगडले! आईच्या प्रियकराकडून हत्या; मृतदेह नाल्यात फेकून अपघाताचा बनाव

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत कुटुंबातील सदस्य किती होते?

    Ans: एकाच कुटुंबातील चार सदस्य मृत अवस्थेत आढळले.

  • Que: पोलिसांना घटनास्थळी काय संशयास्पद आढळले?

    Ans: भिंतीवर ‘सुनेने मारले आहे’ आणि ‘बंटी-बबली’ असे लिहिलेले आढळले.

  • Que: पोलिस कोणत्या दिशेने तपास करत आहेत?

    Ans: पोलिस या प्रकरणाकडे हत्येच्या संशयातून तपास करत आहेत.

Web Title: Uttar pradesh crime suspicious deaths of four members of a millionaire family in prayagraj killed by the daughter in law written on the walla chilling case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 01:26 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Crime : चार वर्षीय मुलाच्या मृत्यूचे गूढ उलगडले! आईच्या प्रियकराकडून हत्या; मृतदेह नाल्यात फेकून अपघाताचा बनाव
1

Mira Bhayandar Crime : चार वर्षीय मुलाच्या मृत्यूचे गूढ उलगडले! आईच्या प्रियकराकडून हत्या; मृतदेह नाल्यात फेकून अपघाताचा बनाव

Solapur Crime: मी तुला आझाद करतोय…; पत्नीसाठी शेवटचा व्हिडीओ बनवत 38 वर्षीय पतीची आत्महत्या
2

Solapur Crime: मी तुला आझाद करतोय…; पत्नीसाठी शेवटचा व्हिडीओ बनवत 38 वर्षीय पतीची आत्महत्या

Pimpri Chinchwad News: पत्नीने दारू पिण्यास नकार दिल्याने पतीची आत्महत्या; विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू
3

Pimpri Chinchwad News: पत्नीने दारू पिण्यास नकार दिल्याने पतीची आत्महत्या; विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू

Beed Crime: घरासमोर लघुशंका आणि जुगार अड्ड्याला दलित महिलेचा विरोध; महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण, एवढेच नाही तर…
4

Beed Crime: घरासमोर लघुशंका आणि जुगार अड्ड्याला दलित महिलेचा विरोध; महिलेच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण, एवढेच नाही तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.