काय घडलं नेमकं?
दोन दिवसांपूर्वी जारौली कटजवळ चहा विक्रेता तेजपाल दुकानात झोपलेला असतांना त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. सकाळी दुकानाबाहेर त्याचा मृतदेह आढळल्यावर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेचा उलगडा करण्यासाठी चार पथके तयार केली आणि तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी जवळपासच्या रहिवाशांची चौकशी केली आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपीला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.
Gujrat Crime: धक्कादायक; लिव्ह-इन पार्टनरच्या मुलींवर लैंगिक अत्याचार, 14 वर्षांची मुलगी गर्भवती
कारण काय?
याप्रकरणात मृत्यू झालेल्या चहा विक्रेतेचा नावं तेजपाल असे आहे. तेजपाल आणि मुकेशचे एका महिलेवरून वाद सुरु होते. मुकेशच्या महिलेसोबत संबंध होते आणि त्याने तिला तेजपालशी बोलण्यास वारंवार विरोध केला होता. मात्र, ती महिला आणि तेजपाल एकमेकांशी बोलत होते, याच रागातून त्याने हत्या करण्याचा कट रचला.
कशी केली हत्या?
घटनेच्या दिवशी मुकेश घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी तेजपाल दुकानात झोपला होता, त्याने लोखंडी सळई आणि पोलादी अवजाराने तेजपालच्या डोक्यावर वारंवार हल्ला केला. यात तेजपालचा जागीच मृत्यू झाला.
गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले असून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Ans: एका महिलेवरून सुरू असलेल्या वादातून.
Ans: लोखंडी सळई व अवजाराने डोक्यावर वार करून.
Ans: आरोपीला अटक करून हत्येचे शस्त्र जप्त केले.






