Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uttarpradesh Crime: इंस्टाग्राम कमेंटवरून तरुणाची निर्घृण हत्या; विटांनी ठेचून मारलं, आरोपी अटकेत

बरेलीमध्ये इंस्टाग्रामवरील आक्षेपार्ह कमेंटवरून 24 वर्षीय अमन रजाची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी समदने विटांनी हल्ला करून मृतदेह लपवला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 12, 2026 | 03:20 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • इंस्टाग्राम कमेंटवरून वादातून हत्या
  • विटांनी हल्ला करून तरुणाचा खून, मृतदेह लपवला
  • आरोपी अटकेत; पोलिसांकडून पुढील तपास सुरू
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २४ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर एक कमेंट केली त्यामुळे त्या तरुणाला जीव गमवावा लागला. अमन रजा असे या तरुणाचे नाव आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिटी रेल्वे स्टेशनजवळील एका पडक्या घरात त्याचा मृतदेह
रक्ताळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. काय घडलं नेमकं?

Bihar Crime: गर्भवती वहिनीचा जबरदस्तीला विरोध, दीराने गळा आवळून केली हत्या; बिहार येथील घटना

काय घडलं नेमकं?

८ एप्रिल रोजी अमनचा मृतदेह एका पडक्या घरात आदळून आला होता. अमन हा मलूकपूरचा रहिवासी आहे. तो एका सलूनमध्ये काम करत होता. ८ एप्रिल रोजी त्याचा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर जखमेच्या २१ खुन्या होत्या. ज्यावरून त्याची हत्या अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अमनच्या कुटुंबीयांनी त्याच्या तीन मित्रांवर संशय व्यक्त केला होता, मात्र पोलिसांच्या तपासात ते निर्दोष आढळले.

कशी केली आरोपींना अटक

पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर देत परिसरातील CCTV फुटेज आणि कॉल डिटेल्सची कसून चौकशी केली. तेव्हा या तपासात जखीरा येथील १९ वर्षीय समद मूसा याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सापळा रचून समदला भाजी मंडई परिसरातून अटक केली. चौकशीदरम्यान समदने आपला गुन्हा कबूल केला असून हत्येमागील कारण ऐकून पोलीसही थक्क झाले. सध्या आरोपीची रवानगी तुरुंगात करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

का केली हत्या?

समद आणि अमन यांची मैत्री सहा महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती. समद जेव्हा जेव्हा इन्स्टाग्रामवर रील पोस्ट करायचा, तेव्हा अमन त्यावर अर्वाच्य आणि आक्षेपार्ह कमेंट्स करायचा. या कारणावरून त्यांच्यात फोनवर अनेकदा भांडणे आणि शिवीगाळ झाली होती. अमनच्या या वागणुकीचा राग मनात धरून समदने त्याला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला.

कशी केली हत्या?

७ एप्रिल रोजी समदने अमनला भेटण्यासाठी बोलावले आणि दोघेही बोलत बोलत रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या निर्जन ठिकाणी गेले. समदने अमनला धक्का देऊन खाली पाडले आणि जवळच पडलेल्या विटांनी त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर सपासप वार केले. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह ओढत नेऊन एका पडक्या खोलीत लपवून ठेवला. अमनचा मृत्यू झाला आहे याची खात्री करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा त्याच्यावर वार केले. पोलिसांनी समदच्या सांगण्यावरून हत्येत वापरलेली रक्ताने माखलेली वीट जप्त केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: मैत्रिणीच्या लग्नावरून वाद; 18 वर्षीय मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, वडिलांवर गुन्हा दाखल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: इंस्टाग्रामवरील आक्षेपार्ह कमेंटमुळे वाद होऊन हत्या झाली.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: आरोपीने विटांनी डोक्यावर वार करून खून केला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: आरोपीला अटक करून पुरावे जप्त केले आणि तपास सुरू आहे.

Web Title: Uttar pradesh crime youth brutally murdered over instagram comment beaten to death with bricks accused arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Delhi Crime News: फुटपाथवरून उचललं, जंगलात नेलं अन्… 11 वर्षीय मुलीच्या हत्येने संतापाची लाट
1

Delhi Crime News: फुटपाथवरून उचललं, जंगलात नेलं अन्… 11 वर्षीय मुलीच्या हत्येने संतापाची लाट

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तुमच्यासमोरच हात पकडतो, काय कराल?’ पतीसमोरच महिलेचा विनयभंग; विरोध करताच मायलेकांकडून हल्ला
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘तुमच्यासमोरच हात पकडतो, काय कराल?’ पतीसमोरच महिलेचा विनयभंग; विरोध करताच मायलेकांकडून हल्ला

Pune Crime News: Instagramवर पिस्तुलांची खरेदी-विक्री करणारा बबलू अटकेत; 5 पिस्तुल आणि 7 जिवंत काडतुसे जप्त
3

Pune Crime News: Instagramवर पिस्तुलांची खरेदी-विक्री करणारा बबलू अटकेत; 5 पिस्तुल आणि 7 जिवंत काडतुसे जप्त

Pune Crime News: लोहगडावर बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू अपघात नव्हे? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य
4

Pune Crime News: लोहगडावर बड्या बिझनेसमनच्या मुलाचा मृत्यू अपघात नव्हे? तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.