काय घडलं नेमकं?
या घटनेतील महिलेचे नाव राधा कुमारी असे आहे. तर तिच्या पतीचे नाव दीपक पटेल असे आहे. दीपक सध्या पुणे येथे मजुरीचे काम करतो. त्यामुळे ती आपल्या मुलांसह गावी राहत होती. राधा ही ३ महिन्यांची गर्भवती होती आणि तिला आधीच २ लहान मुले आहेत. घरातील सर्व सदस्य शेतात गव्हाची कापणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरात कोणीही नसल्याचे पाहून शेजारी राहणारा आणि नात्याने दीर लागणारा साहिल पटेल याने घरात प्रवेश केला. राधा कुमारीवर साहिलने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने याला कडाडून विरोध केला. तेव्हा आरोपीने जवळच असलेली दोरी घेतली आणि तिच्या गळ्याला फास लावून तिची हत्या केली. असा आरोप राधाच्या जिजाजी महेश पटेल यांनी केला.
दुसऱ्यांना फसवण्याचा बनाव पडला फेल
हत्या केल्यानंतर आरोपी साहिलने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतः पोलीस ठाण्यात फोन केला आणि महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे सांगितले. तो या हत्येचा गुन्हा राधाच्या सासू-सासऱ्यांवर ढकलायचे होते. जेणेकरून तो स्वतःला या प्रकरणातून वाचवू शकेल. मात्र पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता काही तांत्रिक पुरावे समोर आले. मृत महिला आणि आरोपी साहिल यांच्यामध्ये मोबाईलवर वारंवार आणि दीर्घकाळ संभाषण झाल्याचे रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहे. या पुराव्यांमुळे पोलिसांचा संशय साहिलवर अधिक बळावला आहे.
पोलीस तपास सुरु
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो कायदेशीर प्रक्रियेनंतर उत्तरीय तपासणीसाठी हाजीपूर येथील सदर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. आरोपी साहिल पटेल सध्या फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा असुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कुटुंबियांकडून कठोर कारवाईची मागणी
राधा कुमारीच्या माहेरचे लोक देखील मुजफ्फरपूर येथून घटनास्थळी पोहोचले आहे. त्यांनी आरोपी साहिलविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.
Ans: जबरदस्तीच्या प्रयत्नाला विरोध केल्यामुळे हत्या झाल्याचा आरोप आहे.
Ans: पोलिसांना फोन करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
Ans: आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी छापेमारी सुरू आहे.






