
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
२० जून रोजी दुपारी पीडित महिला आणि तिचे पती दवाखान्यातून दुचाकीवरून घरी परतत होते. टाऊन हॉल परिसरातील लाल मशिदीजवळ असताना मुजाहेद आलम मुख्तार आलम (रा. आसेफिया कॉलनी) याने त्यांचा पाठलाग करत महिलेकडे अश्लील हावभाव आणि इशारे केल्याचा आरोप आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime) याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आला. मात्र आरोपीने सातत्याने त्रास देत राहिल्याने महिलेच्या पतीने दुचाकी थांबवून त्याला जाब विचारला. यावेळी आरोपीने तुम्ही पाहिले नसेल तर आता तुमच्यासमोरच तिचा हात धरतो. ये लो, अभी आपके सामने हाथ पकड़ा है, क्या कर लोगे तुम? असे म्हणत महिलेचा हात पकडला. (Chhatrapati Sambhajinagar Crime)
यानंतर पीडित महिला संतापली आणि तिने आरोपीच्या आई शमीम बेगम हिला, तुमच्या मुलाला हेच शिकवले का? असा प्रश्न विचारला. यामुळे वाद आणखी वाढला. शमीम बेगम हिने चाकूने महिलेच्या दंडावर वार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. पत्नीला वाचवण्यासाठी पतीपुढे आला असता दोघे मायलेकांनी मारहाण केली. त्यांनतर आरोपी मुजाहेद याने आणखी एक मोठा चाकू काढून पतीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. (Chhatrapati Sambhajinagar Crime) भांडण सोडविण्यासाठी पुढे आलेल्या एका नागरिकालाही दुखापत झाली. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात मुजाहेद आलम मुख्तार आलम आणि शमीम बेगम यांच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण आणि शस्त्राने हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास सुरू आहे.
Ans: ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील टाऊन हॉल परिसरात घडली.
Ans: आरोपीवर महिलेचा विनयभंग, मारहाण आणि शस्त्राने हल्ला केल्याचे आरोप आहेत.
Ans: बेगमपुरा पोलिसांनी आरोपी मुजाहेद आलम आणि शमीम बेगम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.