Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ballia Crime : पतीचे 6 तुकडे, आधी हात-पाय कापले मग मान…, ५० वर्षीय महिलेने प्रेमसंबंधातून केली हत्या; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Ballia Crime News: मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली असून बलियामध्ये निवृत्त सैनिक देवेंद्रच्या पत्नीने तिचा प्रियकर अनिल यादवसोबत मिळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 16, 2025 | 11:30 AM
पतीचे 6 तुकडे, आधी हात-पाय कापले मग मान..., ५० वर्षीय महिलेने प्रेमसंबंधातून केली हत्या (फोटो सौजन्य-X)

पतीचे 6 तुकडे, आधी हात-पाय कापले मग मान..., ५० वर्षीय महिलेने प्रेमसंबंधातून केली हत्या (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

Ballia Crime News in Marathi : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सौरभ राजपूतच्या हत्येप्रमाणेच उत्तर प्रदेशमधील बलियामध्येही एक घृणास्पद हत्याकांड उघडकीस आलं आहे. पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एवढेच नाही तर पतीच्या मृतदेहाचे तुकडे करून वेगवेगळ्या ठीकाणी फेकण्यात आले. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊया…

आरोपी पतीने प्रियकर अनिल यादवसोबत मिळून तिचा निवृत्त लष्करी पती देवेंद्र याची निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर देवेंद्रचे दोन्ही हात, दोन्ही पाय आणि डोके कापून प्रथम पॉलिथिनमध्ये ठेवण्यात आले आणि नंतर त्याची ओळख लपवण्यासाठी ते गाडीत भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले. यानंतर, उर्वरित धड विहिरीत टाकण्यात आले. या अंध हत्येचे गूढ उकलणे पोलिसांसाठी एका आव्हानापेक्षा कमी नव्हते. पण मृत देवेंद्रच्या मुलीने या घृणास्पद हत्येचा खुलासा केला. चकमकीनंतर पोलिसांनी आरोपी अनिल यादव आणि त्याचा साथीदार सतीशला अटक केली. मेरठमधील साहिल आणि मुस्कानचा पती सौरभची हत्या केल्याप्रमाणे बलियामध्येही प्रियकर आणि पत्नीने मिळून पतीची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ज्यामध्ये मृताची पत्नी माया देवी, तिचा प्रियकर अनिल यादव आणि त्याचे दोन साथीदार यांचा समावेश आहे. अटक करण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चकमकीत एका आरोपीच्या पायात गोळी लागली.

रस्त्याच्या बाजूला झोपला अन् भयंकर घडलं; पुणे स्टेशन परिसरात भरधाव कारने एकाला चिरडलं

दोन दिवसांपूर्वी बलिया जिल्ह्यातील सिकंदरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील खारिद दियारा येथील एका शेतात कापलेले हात आणि पाय आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. नंतर पोलिसांना विहिरीतून त्याच मृतदेहाचे धड सापडले. तपासात हे शरीराचे अवयव निवृत्त सैनिक देवेंद्र यांचे असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा तपास पुढे नेला तेव्हा एक धक्कादायक खुलासा झाला.

ओळख लपवण्यासाठी मृतदेहाचे तुकडे

पोलिस तपासात असे दिसून आले की, निवृत्त सैनिकाच्या पत्नीचे ट्रक ड्रायव्हर अनिल यादवसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील बहादुरपूर येथील घरात देवेंद्रची निर्घृण हत्या केली. त्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी मृतदेहाचे सहा तुकडे केले. यामध्ये शरीरापासून हात, पाय आणि धड बोलेरो गाडीतून सिकंदरपूर पोलिस ठाण्याच्या डायरा परिसरात फेकून देण्यात आले.

मुलीने केला हत्येचा खुलासा

पोलीस चौकशीदरम्यान, मृत देवेंद्रच्या मुलीने या हत्येचा खुलासा केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अनिल यादवचा शोध सुरू केला. सोमवारी रात्री सदर कोतवाली परिसरात वाहन तपासणीदरम्यान, पोलिसांनी दुचाकीवरून येणाऱ्या दोन तरुणांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात, आरोपी अनिल यादवच्या पायाला गोळी लागली तर हत्येत मदत करणारा त्याचा साथीदार सतीश यादव यालाही पोलिसांनी पकडले. या हत्येत सहभागी असलेल्या निवृत्त सैनिकाच्या पत्नीविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील कारवाई सुरू केली आहे.

प्रेमसंबंधातून हत्या

या घटनेचा खुलासा झाल्यानंतर परिसरात बरीच चर्चा सुरू आहे. मेरठ घटनेप्रमाणेच या घटनेनेही लोकांमध्ये प्रचंड संताप आणि भीती निर्माण झाली आहे. निवृत्त सैनिक देवेंद्र कुमार यांची पत्नी आणि आरोपी ट्रक चालक अनिल यादव यांचे बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते, त्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. एएसपी कृपा शंकर म्हणाले की, वॉन्टेड व्यक्तीच्या शोधात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी रात्री उशिरा एका मोटारसायकलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता पोलिस पथकावर गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपी अनिल यादवच्या पायाला गोळी लागली, तर त्याचा साथीदार सतीशला अटक करण्यात आली.

वाहतूक पोलिसाच्या मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; दोन आरोपींना ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Web Title: Uttar pradesh meerut saurabh rajput like murder in ballia retired soldier brutally murdered by wife and lover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • crime
  • police
  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

Nagpur Crime: घराबाहेर चकरा का मारतोस विचारण पडल महागात, एकाची थेट हत्या; नागपुरातील घटना!
1

Nagpur Crime: घराबाहेर चकरा का मारतोस विचारण पडल महागात, एकाची थेट हत्या; नागपुरातील घटना!

Nanded Crime: नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड! भावाच्या खुनाचा रुग्णालयातच घेतला बदला; धुरंधरचा लेट नाईट शो आणि….
2

Nanded Crime: नांदेडमध्ये तिहेरी हत्याकांड! भावाच्या खुनाचा रुग्णालयातच घेतला बदला; धुरंधरचा लेट नाईट शो आणि….

Solapur Accident: झोपेची पेंग महागात! कार थेट कालव्यात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, तर…
3

Solapur Accident: झोपेची पेंग महागात! कार थेट कालव्यात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, तर…

Telangana Crime: विकृत मानसिकतेचा कळस! मुलगाच हवा आहे म्हणत बापानेच मुलींसह पत्नीचा जीव घेतला
4

Telangana Crime: विकृत मानसिकतेचा कळस! मुलगाच हवा आहे म्हणत बापानेच मुलींसह पत्नीचा जीव घेतला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.