
crime (फोटो सौजन्य: social media)
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या जावयावर आणि मुलीच्या सासरकडच्या मंडळींवर गंभीर आरोप केले. माझ्या मुलीला याच लोकांनी मारुन टाकलय. तिचा मृतदेह गायब केलाय असे गंभीर आरोप मुलीच्या आईने केले. या प्रकरणी तिने FIR देखील केले. पण मुलीचं सत्य समोर येताच आईला धक्काच बसला आणि सासरच्या मंडळींनाही आरोप खोटे निघाल्यामुळे दिलासा मिळाला. परंतु नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया.
कराड पोलिसांची मोठी कारवाई; सापळा रचून दोघांना पकडले अन्…
नेमकं प्रकरण काय?
तर घडलं असं, उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमधील राजवंती देवी यांनी पोलीस स्टेशनमध्ये ३ ऑक्टोंबरला एफआयआर नोंदवला. माझी मुलगी रुची हिला सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळलं आहे. त्यांनतर तिची हत्या करून तिचा मृतदेह गायब केला असं गंभीर आरोप सासरच्यांवर लावले आहे. त्यांनतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
चौकशीत पोलिसांना कळालं मुलगी जिवंत होती. आणि एवढेच नाही तर तिने मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये दुसऱ्या कोणाशी तरी विवाह करून तिथे राहत होती. शुक्रवारी सकाळी ७ वाजता बरेहता पोलीस विवाहितेपर्यंत पोहोचले. तिची चौकशी करण्यात आली तेव्हा तिने घडलेलं सगळं सांगितलं.
विवाहितेने सांगितलं की, शाळेपासून तिचं एका मुलावर प्रेम होतं. त्याच्यासोबत तिला लग्न करायचं होतं. परंतु तिच्या घरच्यांनी तिचं लग्न जबरदस्तीने मर्जीविरुद्ध दुसऱ्याशी लग्न लावून दिल. जबरदस्तीने लग्न केलं म्हणून ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. मात्र मुलीच्या आईने जावयासह त्याच्या कुटुंबावर धक्कादायक आरोप केले आहे. त्यांची नाहक बदनामी केली.
काय आरोप केले मुलीच्या आईने?
हथौडा येथे राहणाऱ्या राजेंद्रच 6 जून 2023 रोजी रुची सोबत लग्न झालं. 3 ऑक्टोंबरला मुलीच्या आईने तक्रार देताना सांगितलं की, हुंडा म्हणून 50 हजार रुपये आणि दागिने दिले होते. हुंड्यामध्ये बाइक दिली नाही म्हणून तिचा छळ सुरु होता. सासरची मंडळी तिला मारहाण करण्यासह जेवायला देत नाही, असे आरोप मुलीच्या आईने केले. सासरची मंडळी आमच्या घरी येऊन आम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचे. रुचीच्या वडिलांचं निधन झालं, त्यावेळी सुद्धा तिला अंत्यदर्शनासाठी येऊ दिलं नाही असे आरोप त्यांनी तक्रारीत केले होते.
अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणे भोवलं; पोलिसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं
Ans: उत्तरप्रदेश
Ans: ग्वालियर
Ans: जावई