हगवणेच्या वकिलांची अडचण वाढणार; 'त्या' वक्तव्यामुळे गोत्यात येणार? राज्य महिला आयोगाने तर...
Vaishnavi Hagawane Death Mystery In Marathi: पुणे जिल्ह्यातील २४ वर्षीय वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी पुणे येथील दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी तीन आरोपींच्या पोलिस कोठडीत बुधवारपर्यंत वाढ केली. यामध्ये वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नंनद करिश्मा यांचा समावेश आहे. फिर्यादी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. आरोपींच्या चौकशीदरम्यान वैष्णवी मारहाणीसाठी वापरण्यात आलेल्या काडतूसही जप्त करण्यात आले.यामध्ये काठ्या आणि इतर घन वस्तूंचा समावेश आहे. तसेच, हुंड्यात मिळालेल्या सोन्याच्या दागिन्यांसह इतर वस्तू जप्त करणे अद्याप प्रलंबित आहे. याचदरम्यान आता वैष्णवीला झालेल्या मारहाणीबाबत मोठा खुलासा झाला आहे.
पुण्यातील भूकुम गावतील हगवणे कुटुंबाच्या छळापायी आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या आरोपींना बुधवारी (28मे) कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी आणि आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात आता तपासाला नवे वळण आले आहे. कोर्टात पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी न्यायालयात धक्कादायक माहिती दिली आहे.
वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीचे ३० खुणा आढळले आहे. यापैकी 15 जखमा आत्महत्या करण्यापूर्वी चोवीस तासांच्या आत असल्याची माहिती याआधीच समोर आली. वैष्णवीला सतत सासरच्या लोकांकडून आणि नवऱ्याकडून मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात आला. तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मारहाणीमुळे झालेल्या जखमांवर भाष्य केले जात आहे.
दरम्यान, पाचही आरोपीचे मोबाईल फोन अद्याप पोलिसांच्या ताब्यात आले नव्हेत. त्यामुळे तपासात अडथळे येत होते. याच कारणास्तव पोलिसांनी न्यायालयात आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती केली होती. जेणेकरून मोबाईलचा शोध घेणे शक्य होईल. पोलिसांन जर आज हे मोबाईल हाती लागले तर वैष्णवीच्या मृत्यूमागचे अनेक गूढ उकलू शकतात, असे म्हटले जात आहे. तसेच वैष्णवीला 120 तास टॉर्चर करण्यात आले, अशी धक्कादायक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
तसेच न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग व्ही.पी. खंडारे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान, फिर्यादी पक्षाने उघड केले की शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर ३० जखमांच्या खुणा आढळल्या. राज्य सरकारतर्फे उपस्थित असलेले सहाय्यक सरकारी वकील नितीन अडागळे यांनी न्यायालयाला सांगितले की यापैकी २९ जखमा तिच्या मृत्यूपूर्वी झाल्याचे आढळून आले. अहवालानुसार, १५ जखमा ताज्या होत्या आणि तिच्या मृत्यूच्या २४ तास आधी झाल्या होत्या. त्याच वेळी, एक जखम ४ ते ६ दिवस जुनी असल्याचे आढळून आले, तर इतर ११ जखमा ५ ते ७ दिवस जुन्या होत्या. याशिवाय, दोन जखमांचा कालावधी ३ ते ६ दिवसांपूर्वीचा असल्याचे मानले जात आहे.
आतापर्यंत पोलिसांनी एक कार, एक स्कूटर आणि चांदीची भांडी जप्त केली आहेत, जी हुंड्यात देण्यात आली आहेत. तसेच, या प्रकरणात फरार असलेल्या आणि मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या व्यावसायिक निलेश चव्हाणचा शोध सुरू आहे. सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने तिन्ही आरोपींच्या कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे जेणेकरून तपास पुढे नेता येईल.