वैष्णवी मृत्यू प्रकरणात कोर्टात नेमके काय घडले? (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवरा, सासरा, सासू आणि नणंद यांना कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नवरा शशांक, सासू लता, आणि नणंद करीश्मा यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान आज कोर्टात हगवणेच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवाद चांगलाच चर्चेत आला आहे.
वैष्णवी दुसऱ्या व्यक्तीसोबत चॅट करत होती- वकिलांचा युक्तिवाद
वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, ते आम्ही पकडले. त्याची माहिती आम्हाला हवी होती. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती, तिने अनेक वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. नको त्या व्यक्तीने नाही म्हटले म्हणून तिने आत्महत्या केली असावी. आत्महत्या करण्याचे मुख्य कारण वेगळे आहे, त्याचा शोध आम्हाला घ्यायचा आहे, असे हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी म्हटले आहे.
पोलीस कोठडीची गरज नाही – हगवणेंचे वकील
पोलीस कोठडी देण्याची काहीच गरज नाही आहे. गहाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे, हे हगवणे कुटुंबाने आधीच सांगितले आहे. निलेश चव्हाणला आरोपी करणे चुकीचे असून, त्याचा यात काहीच संबंध नाही. तो फक्त हगवणे यांचा नातेवाईक आहे. त्याने बाळाला सांभाळताना हेळसांड केली म्हणून त्यावर गुन्हा दाखल केला. तो चुकीचा असेल, तर त्याला फाशी द्या, असे हगवणेंच्या वकिलाने म्हटले आहे.
४० लाख रुपयांची गाडी दिली असे ते (वैष्णवीच्या माहेरचे) म्हणतात. आमच्या घरात ५ कोटी रुपयांच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला त्रास देऊ, असे म्हणत हगवणे कुटुंबाची बाजू त्यांचे वकील विपुल दोशी यांनी मांडली आहे. चॅट करणाऱ्या व्यक्तीने त्रास दिला असावा, म्हणून तिने आत्महत्या केली असावी. असा दावा दोशी यांनी केला आहे.
फिर्यादीच्या वकिलांची मागणी काय?
वैष्णवी मृत्यू प्रकरणात आरोपीना आज कोर्टात हजर करण्यात आले. यावले फिर्यादीच्या वकिलांनी कोर्टसमोर त्यान पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली. फरार असलेला नीलेश चव्हाण कुठे आहे याची चौकशी करायची आहे. वैष्णवीला मारहाण करण्यात आलेली हत्यारे जप्त करायची आहेत. त्यासाठी पोलिस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी वकिलांनी केली.
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; सासरा, दीराला तीन दिवसांची पोलीस कोठडी
सासरा, दीराला तीन दिवसांची पोलीस कोठडी
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर आली आहे. दरम्यान वैष्णवी यांचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नवरा शशांक, सासू लता, आणि नणंद करीश्मा यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.