Valwanti village Sarpanch Fatally attacks young man in Vadgaon Maval Crime News
Crime News : वडगाव मावळ : मावळमधील अनेक धक्कादायक आणि गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. मावळातील वळवंती गावात सरपंचाने तरुणाला जीवघेणा हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मावळ भागामध्ये दादागिरी वाढली असल्याचे दिसून येत आहे.
रविवारी (दि.10) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात सरपंचासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये स्वप्निल तुकाराम शिंदे (वय 26) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून गावाचे सरपंच रोहिदास जांभूळकर तसेच साथीदार तुषार जांभुळकर, अभिषेक जांभुळकर, दिलीप जांभुळकर, रामदास जांभुळकर,अमोल रगडे, प्रमेश जांभुळकर, बाळा शिंदे व बाळा जांभुळकर या 9 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शुभम दत्तात्रय डेनकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व शुभम हे गावात मंदिरासमोर थांबले होते. मात्र यावेळी आरोपी व त्यांचे साथीदार हातात लोखंडी रॉड व काठी घेऊन तिथे आले त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी गार्डनच्या काचाही फोडल्या व जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी सरपंच रोहिदास जांभूळकर याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यावरून कामशेत पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी क्लिक करा
MD ड्रग्जची खुलेआम विक्री
मावळ तालुक्यात अंमली पदार्थांची वाढती तस्करी ही पोलिसांसमोर मोठी डोकेदुखी ठरत असून अशातच उर्से गावच्या हद्दीत सव्वा लाख रुपयांचे मेफेड्राॅन (एम. डि) ड्रग्स जप्त करण्यात आले हि कारवाई (दि ११ ) रोजी दुपारच्या सुमारास फिनोलेक्स कंपनी समोर ब्रिजजवळ करण्यात आली आहे याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. समेश राजू तिकोणे (वय. २१.राहणार. कान्हे फाटा ता.मावळ जि.पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील उर्से गावच्या हद्दीत असणाऱ्या फिनोलेक्स केबल कंपनीसमोर एक तरुण मेफेड्राॅन (एम. डी) हा अमली बेकायदेशीर रित्या पदार्थ विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे दि ११ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी पोलिसांनी कारवाई करत तरुणाला रंगेहाथ पकडून त्याच्या जवळील ११.७५० ग्रॅम मेफेड्राॅन (एम. डी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.यावेळी आरोपींकडून १ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपींवर एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 22 (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास शिरगाव-परंदवडी पोलीस करत आहेत.