Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना

उलट्यांचा त्रास झाल्याने आठ वर्षांच्या चिमुकलीला क्लिनिकमध्ये नेले; उपचारानंतर नाक-तोंडातून रक्तस्राव सुरू झाला अन् काही वेळातच तिचा मृत्यू झाला. वसईतील या घटनेप्रकरणी कथित बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 01, 2026 | 10:44 AM
Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना

Crime News: दोन इंजेक्शन्स दिली अन् काही वेळातच चिमुकलीच्या नाक-तोंडातून रक्त; वसईत धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:
  • उपचारानंतर ८ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू
  • कथित बोगस डॉक्टरवर वालीव पोलिसांत गुन्हा
  • शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार
 

वसई : उलट्यांचा त्रास होत असल्याने उपचारासाठी क्लिनिकमध्ये नेलेल्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुकलीचा उपचारानंतर काही वेळातच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसई पूर्वेतील भोयदापाडा परिसरात घडली. कथित बोगस डॉक्टरने दिलेल्या गोळ्या आणि दोन इंजेक्शन्सनंतर मुलीच्या नाकातून व तोंडातून रक्तस्राव सुरू झाला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई करत वालीव पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उलट्यांचा त्रास झाल्याने क्लिनिकमध्ये नेले

मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेतील भोयदापाडा परिसरात राहणारी मरियम अन्सारी (८) हिला २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास उलट्या सुरू झाल्या. तिची प्रकृती पाहता आईने तिला राजावळी पालनगर येथील ‘राहुल क्लिनिक’मध्ये नेले. तेथे धूपचंद निषाद (४२) याने मरियमची तपासणी करून काही गोळ्या दिल्या. तसेच दोन इंजेक्शन्स दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: चौकशीदरम्यान आरडाओरड अन् ‘अँग्झायटी अटॅक’चा दावा; डॉ. गायकवाड हल्ला प्रकरणात ‘बिग बॉस’फेम दिव्याची कोठडी वाढली

दुसऱ्या दिवशी अचानक रक्तस्राव

दुसऱ्या दिवशी सकाळी आईने मरियमला चहा आणि टोस्ट दिला. त्यानंतर काही वेळातच तिच्या नाकातून आणि तोंडातून अचानक रक्तस्राव सुरू झाला. प्रकृती बिघडल्यानंतर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नातेवाईकांनी उपचाराबाबत गंभीर आरोप केले. मात्र, मुलीच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन अहवालानंतर त्याबाबत अधिक स्पष्टता येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वैद्यकीय पदवीबाबत प्रश्नचिन्ह

घटनेनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित क्लिनिकची चौकशी केली. महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांच्या माहितीनुसार, धूपचंद निषाद स्वतःकडे ‘इलेक्ट्रो होमिओपॅथी’ची पदवी असल्याचे सांगत होता. मात्र, त्याच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची (MMC) मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी नसल्याचे तपासणीत आढळल्याचे सांगण्यात आले. तरीही तो अ‍ॅलोपॅथीची औषधे आणि इंजेक्शन्स देत असल्याचा आरोप आहे. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवासराव दुधमल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर वालीव पोलिसांनी संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा:कात्रज घाटात प्रवास करताना थरार! दगडूशेठच्या दर्शनासाठी निघाले पण दाम्पत्याला अडवून तिघांनी जे केले ते…

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

वालीव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप केरेकर यांनी सांगितले की, संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकलीच्या शवविच्छेदन अहवालानंतर तिच्या मृत्यूचे अचूक कारण स्पष्ट होईल. त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, आरोपी धूपचंद निषाद याने स्वतःवरील आरोप फेटाळले असून, नातेवाईकांचे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील नेमके वैद्यकीय कारण आणि उपचारांची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.

Web Title: Vasai 8 year old girl death alleged bogus doctor rahul clinic sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • Bogus Doctor
  • Crime . Crime News
  • Doctors News
  • Vasai news

संबंधित बातम्या

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?
1

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?

Latur Crime news: ‘पीक पाहणी का केली नाही?’ म्हणत तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण
2

Latur Crime news: ‘पीक पाहणी का केली नाही?’ म्हणत तलाठ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण
3

प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणांशी मैत्री ठेवली म्हणून पिस्तूल रोखले; १९ वर्षीय तरुणाला बांबूने बेदम मारहाण

Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीचा हिशेब मागितला अन् मित्राची हत्या; धावत्या एक्सप्रेसमधून आरोपी जेरबंद
4

Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीचा हिशेब मागितला अन् मित्राची हत्या; धावत्या एक्सप्रेसमधून आरोपी जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.