Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Virar: नालासोपाऱ्यात गुंडाची निर्घृण हत्या; 7-8 जणांनी चाकूने केले सपासप वार

नालासोपारा येथे पूर्ववैमनस्यातून 31 वर्षीय शुभम मिश्रा याची चाकू व दगडाने निर्घृण हत्या झाली. सिगारेटच्या बहाण्याने पंचमुखी हनुमान मंदिराजवळ हल्ला झाला. नालासोपारा पोलीस गुन्हा दाखल; आरोपी फरार.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 22, 2026 | 12:57 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बारमध्ये वादानंतर सूडाची भावना
  • सिगारेटच्या बहाण्याने पंचमुखी हनुमान मंदिराजवळ नेले
  • 7-8 जणांकडून चाकूने वार व दगडाने हल्ला
वसई-विरार: वसई-विरार येथील नालासोपाऱ्यात एका गुंडाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 7-8 जणांनी दगडाने ठेचून आणि चाकूने सपासप वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव शुभम मिश्रा (३१) असे आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण आहे. शुभम मिश्रा हा तडीपारीची शिक्षा भोगून आला होता. पूर्ववैमनस्यातून त्याच्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

Santosh Deshmukh Case : ‘फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी येऊन गेला, CID नेही केलं मान्य’; धनंजय देशमुखांचा दावा

काय घडलं नेमकं?

शुभम मिश्रा हा नालासोपारा पूर्वेच्या गालानगरमधील रहिवासी होता. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो तडीपारीची शिक्षा भोगून आला होता. शुक्रवारी रात्री तो आपल्या अंकित पांडे, रोशन सिंग आणि इतर मित्रांसोबत ‘निधिशा बार’मध्ये मद्यपान करत होता. याच दरम्यान जुन्या तक्रारीवरून शुभम आणि रोशन सिंग यांच्यात जोरदार वादावादी झाली. उपस्थित मित्रांनी हा वाद त्यावेळी सोडवला. मात्र रोशनच्या मनात सुडाची भावना कायम होती.

सिगारेट पिण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबवली 

रात्री साडेअकराच्या सुमारास टिंकल मिश्रा याने शुभमला भेटायला बोलावले. शुभम आणि अंकित रिक्षाने जात असतांना नालासोपारा पश्चिमेकडील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सिगारेट पिण्याच्या बहाण्याने रिक्षा थांबवण्यात आली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या रोशन सिंग, जगन महेंडी, सुनील मालुसरे आणि सुरज कबाडिया या चौघांनी दुचाकीवरून येऊन शुभमवर हल्ला चढवला.

निर्घृण हत्या

सुनील मालुसरे याने शुभमवर चाकूने सपासप वार केले, तर रोशन सिंग, जगन महेंडी, सुरज कबाडिया या तिघांनी त्याला खाली पडून दगडाने त्याचे डोके आणि शरीर ठेचून काढले. या हल्ल्यात शुभमचा जागीच मृत्यू झाला. शुभमचे नुकतेच लग्न झाले असून त्याला सात महिन्यांचा लहान मुलगा आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

Beed Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल; तिघांवर गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ल्याचे कारण काय?

    Ans: जुन्या वैमनस्यातून व बारमधील वादातून सूडाची भावना.

  • Que: हल्ला कसा झाला?

    Ans: सिगारेटच्या बहाण्याने थांबवून 7-8 जणांनी चाकू व दगडाने हल्ला केला.

  • Que: पोलिसांची कारवाई काय?

    Ans: गुन्हा दाखल; सर्व आरोपी फरार असून शोधमोहीम सुरू.

Web Title: Vasai virar brutal murder of a goon in nala sopara 7 8 people stabbed him repeatedly with knives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • crime
  • Nalasopara
  • Vasai Virar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा
2

Vasai-Virar News: वसई-विरार नाट्यगृहाला ‘मजेटीया’ नाव देण्यास विरोध; ‘या’ नावाची मागणी, आंदोलनाचा इशारा

पठ्ठ्यांनो व्हा तयार! विरारमध्ये रंगणार राज्यस्तरीय Kabaddi स्पर्धेचा थरार; २५ जिल्हे, ५० संघ अन् ८००…
3

पठ्ठ्यांनो व्हा तयार! विरारमध्ये रंगणार राज्यस्तरीय Kabaddi स्पर्धेचा थरार; २५ जिल्हे, ५० संघ अन् ८००…

Mumbai News: रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क
4

Mumbai News: रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.