Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागपूर हिंसाचार प्रकरणात विहिंपचा मोठा आरोप, “आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणारे फोन अजूनही… “

नागपुरातील हिंसा पूर्वनियोजित होती आणि या हिंसेमागे असलेले अनेक जण अजूनही मोकळे फिरत आहेत. या संपूर्ण प्रकरणात अनेक विहिंप कार्यकर्त्यांना आजही जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, त्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य केलं जात आहे

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 15, 2025 | 08:34 AM
nagpur(फोटो सौजन्य: social media )

nagpur(फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

नागपूरमध्ये नुकत्याच घडलेल्या हिंसाचार प्रकरणावर विश्व हिंदू परिषद (विहिंप) आक्रमक झाली आहे. परिषदेकडून करण्यात आलेल्या आरोपांनुसार, नागपुरातील हिंसा पूर्वनियोजित होती आणि या हिंसेमागे असलेले अनेक जण अजूनही मोकळे फिरत आहेत. या संपूर्ण प्रकरणात अनेक विहिंप कार्यकर्त्यांना आजही जीवे मारण्याच्या धमक्या येत असून, त्यांना वैयक्तिकरित्या लक्ष्य केलं जात आहे, असा गंभीर आरोप विहिंपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केला आहे.

Mumbai Crime : पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा ऐरणीवर! १ लाखाची लाच घेताना वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले

पूर्वनियोजित हिंसेचा आरोप, अजूनही धमक्यांचे कॉल सुरू

मिलिंद परांडे यांनी सांगितले की, “नागपुरातील अनेक कार्यकर्त्यांना फोनद्वारे धमकावलं जात आहे. या धमक्या देणारे तेच लोक आहेत जे दंगल घडवण्यात सहभागी होते. यातील बरेच जण अजूनही मोकळे असून, यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. आम्ही यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.”

औरंगजेब कधीच आदर्श ठरू शकत नाही

विहिंपने नागपुरात घेतलेल्या आंदोलनाचा बचाव करत परांडे म्हणाले, “बजरंग दल आणि विहिंपने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानासाठी आंदोलन केलं. हे आदर्श पुरूष देशासाठी प्रेरणास्थान आहेत. औरंगजेबासारखा अत्याचारी व्यक्ती कधीच या देशात आदर्श ठरू शकत नाही.”

जातनिहाय गणनेवर विहिंपची स्पष्ट भूमिका

जातनिहाय जनगणना या राष्ट्रीय मुद्द्यावरही विहिंपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मिलिंद परांडे यांनी सांगितले की, “विहिंप हे संघटन हिंदू धर्माच्या एकात्मतेसाठी काम करत आहे. आम्ही कोणत्याही जातीसाठी वेगळं धोरण घेत नाही. सरकारने संपूर्ण लोकसंख्येची जातनिहाय गणना करण्याचा निर्णय घेतला आहे, हे स्वागतार्ह आहे. यात मुस्लिम समाजातील विविध जातींचीही गणना होणार असून, त्यामुळे पसमांदा मुस्लिम, म्हणजेच मागास मुस्लिम समाजाची वस्तुस्थिती समोर येईल.”

नाशिक महाकुंभसाठी जागेची कमतरता

विहिंपने येत्या नाशिक महाकुंभच्या आयोजनाबाबतही चिंता व्यक्त केली आहे. परांडे म्हणाले, “नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यासाठी उपलब्ध जागा ही इतर कुंभ स्थळांशी तुलना करता खूपच कमी आहे. त्यामुळे व्यवस्थापनात अडचणी निर्माण होऊ शकतात. आम्ही सरकारशी आणि संत समाजाशी संवाद साधत आहोत. मात्र जागेच्या मर्यादेमुळे सर्व अडचणी सोडवणं शक्य नाही.”

विहीपचे म्हणणे काय ?

  • पूर्वी जातनिहाय गणनेची मागणी फक्त हिंदू धर्मासंदर्भात होती. मात्र, आता संपूर्ण लोकसंख्येच्या जातनिहाय गणनेचा निर्णय झाला आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये अंतर आहे.
  • जातनिहाय गणनेचा आदेश आला, तरी आम्ही हिंदू समाजाच्या ऐक्य कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहू.
  • जातनिहाय गणनेच्या माध्यमातून मुस्लिम धर्मातील विविध जातींची ही गणना होईल आणि त्यामुळे पसमांदा मुस्लिम म्हणजेच मागास मुस्लिमांसंदर्भातले सत्यही देशासमोर येईल आणि सरकारच्या निर्णयाचा तोच अर्थ निघतो..
  • नाशिक आणि त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभ साठी उपलब्ध असलेली जागा कुंभ साठी उपलब्ध असलेल्या इतर कुठल्याही शहरातील जागेपेक्षा कमी. त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात.
  • आम्ही संतांशी तसेच सरकारच्या ही संपर्कातअसून संवादातून अडचणींवर मार्ग करण्याचा प्रयत्न करू. मात्र, कमी जागेमुळे सर्व अडचणींवर मार्ग काढता येईल असे वाटत नाही.
  • नागपूर हिंसाचार पूर्वनियोजित होते हे स्पष्ट आहे.
  • आमच्या अनेक कार्यकर्त्यांना आजही जीवे मारण्याची धमकी देणारे फोन येत असून त्यांना टार्गेट केले जात आहे.
  • त्यामुळे नागपुरात दंगल घडवणारे आजही मोकळे फिरत असल्याने नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी अटक होण्याची गरज आहे. आम्ही या संदर्भात पोलिसांना कळवले आहे आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे.
  • बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने नागपुरात जे आंदोलन केलं, ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेमापोटी केलं. या देशात छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज हेच आदर्श ठरू शकतात. औरंगजेब या देशात कधीही आदर्श होऊ शकत नाही.
  • औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असावी की नाही, यासंदर्भात मात्र कुठल्याही स्पष्ट उत्तर दिलं नाही.

ससून हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, तपासात सुरक्षारक्षकाचा धक्कादायक उलगडा

Web Title: Vhps big allegation in nagpur violence case phone calls threatening to kill our workers are still

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2025 | 08:34 AM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • Nagpur
  • Vishva Hindu Parishad

संबंधित बातम्या

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
1

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण
2

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

मैत्रिणींसाठी ‘तो’ बनला चोर; एक-दोन नाहीतर तब्बल 9 ठिकाणी घरफोडी, दुचाकीवर फिरला अन्…
3

मैत्रिणींसाठी ‘तो’ बनला चोर; एक-दोन नाहीतर तब्बल 9 ठिकाणी घरफोडी, दुचाकीवर फिरला अन्…

VHP on Garba Event 2025 : कपाळावर कुंकू, गोमुत्र आणि आधार कार्ड…; गरबा खेळण्यासाठी नियमावली जाहीर
4

VHP on Garba Event 2025 : कपाळावर कुंकू, गोमुत्र आणि आधार कार्ड…; गरबा खेळण्यासाठी नियमावली जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.