
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
सकाळी साडेनऊच्या सुमारास दक्ष पाटील (वय २५) हा तरुण परिसरात फोटो काढत होता. त्याने डोंगराळ भागाकडे मोबाईल झूम करून पहिला. त्यावेळी एका झाडाला व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत दिसून आली. त्याने तातडीने या घटनेची माहिती मांडवी पोलिसांना दिली. या डोंगराळ भागात कुणी जात नसल्याने मृतदेह कित्येक दिवस तेथेच लटकलेल्या अवस्थेतच असता. या डोंगराळ भागात एका ३४ वर्षीय तरुणाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.
Hingoli Crime: निर्दयी कृत्य! पाच दिवसांच्या बाळाला झुडपात टाकून पळ काढला; पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना संबंधित व्यक्तीने गमछ्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळले. अंगझडतीदरम्यान मिळालेल्या आधार कार्डावरून मृताची ओळख पटली. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव लालमोहन पारस चौहान (वय ३४, मूळ उत्तर प्रदेश) अशी पटली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हा प्रकार आत्महत्येचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून मांडवी पोलीस अधिक तपास करत आहेत. मांडवी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे न मिळाल्याने 17 वर्षीय मुलीची आत्महत्या; मन हेलावणारी घटना
पालघर जिल्ह्यातील विरार परिसरातून एक अत्यंत मन हेलावणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्यामुळे तो दुरुस्त करण्यासाठी घरातून पैसे न मिळाल्यानं नाराज झालेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण विरार परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव अनिता महादेव सलगरे असे आहे. ती आपल्या आईसोबत विरार पूर्व येथील गडगापाडा परिसरात ‘आय जीवदानी दर्शन’ चाळीमध्ये राहत होती. तेव्हा रविवारी रात्री साधारण 10.45 वाजेच्या सुमारास जेव्हा घरात सर्व जण होते तेव्हा अनिताने आपल्या राहत्या घरातील खोलीत छताला असलेल्या लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेत आपले जीवन संपवले. जेव्हा हा प्रकार तिच्या कुटुंबियांच्या लक्षात आला तेव्हा तिला तातडीने खाली उतरवले मात्र तिचा मृत्यू झाला होता.
Akola News: NEET पेपरफुटीच्या तणावातून होतकरू विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; अकोल्यातील घटना
Ans: विरार तालुक्यातील मांडवी परिसरातील कुलस्वाई माता मंदिराजवळ ही घटना घडली.
Ans: फोटोशूट करताना एका तरुणाने मोबाईल कॅमेऱ्याने झूम केल्यावर मृतदेह दिसला.
Ans: मृताची ओळख लालमोहन पारस चौहान (वय 34, मूळ उत्तर प्रदेश) अशी पटली.