Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण… लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट 

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टनममधून धक्कादयक बातमी उघडकीस आली असून इथे पतीनेच पत्नीची निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 13, 2026 | 08:16 PM
बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण... लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट 

बेडवर निपचित पडलेलं शरीर अन् अंगावर जखमांचे व्रण... लाखोंचा हुंडा घेऊन पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट 

Follow Us
Follow Us:
  • लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर तेजश्रीचा संशयास्पद मृत्यू झाला असून पतीवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे.
  • आरोपी पतीने लग्नासाठी खोटी माहिती देत मोठा हुंडा घेतल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.
  • पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून हुंडाबळी आणि हत्येच्या आरोपांखाली तपास सुरू आहे.
आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतरच पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला ज्यानंतर संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. श्रीकाकुलममध्ये राहणाऱ्या तेजश्रीचे दोन महिन्यांआधी विशाखापट्टणममधील अरगोलू येथील निवासी दप्पा सोमेश्वर राव याच्याशी लग्न झाले होते. पतीने पैशांच्या हव्यासापोटी पत्नीची निघृण हत्या केली आणि नंतर तिने आत्महत्या केल्याचे सर्वांना भासवले. माहितीनुसार, तिच्या शरीरावर मिळालेल्या जखमांवरुन हत्येचा हा कट उघडकीस आला.

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; राहुरीतून मुख्य संशयित धनंजय लोखंडे अटकेत

सांगण्यात येत आहे, लग्नाआधी आरोपी पतीने तेजश्रीच्या आई-वडिलांना अनेक मोठमोठे दावे केले होते. त्याने सांगितले की, तो विशाखापट्टणम येथे डॉकयार्ड कर्मचारी आहे. याचबरोबर रामा टॉकीज परिसरात त्याचे महिला हाॅस्पटल असल्याचेही त्याने सांगितले होते ज्यातून त्याची २ लाखांपर्यंतची कमाई होत होती. आपली मुलगी एका श्रीमंत आणि सुरक्षित घरात जात आहे असा विचार करत तेजश्रीच्या घरच्यांनी तिच लग्न दप्पा सोमेश्वर रावसोबत लावून दिलं होतं पण त्यांच्या याच चुकीने त्यांच्या मुलीचा जीव घेतला. ६ मार्च रोजी दोघांचाही शाही विवाहसोहळा पार पडला. या लग्नात सोमेश्वरला तब्बल १८ लाखांचा हुंडा आणि १९ तोळ सोनं देखील देण्यात आलं होतं. इतकंच नाही तर अनेक महागड्या भेटवस्तूंसोबत त्यांच्या लग्नात २८ लाखांचा खर्च करण्यात आला होता. पण इतकं सगळं करुनही सोमेश्वरचा लोभ मिटला नाही आणि त्याने आपल्याच पत्नीची निर्दयीपणे हत्या केली.

ल्ग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच केला जात होता छळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमेश्वरने लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. त्याने तेजश्रीला हे स्पष्ट सांगितले होते की, हे लग्न त्याने तिच्या सुंदरतेसाठी नाही तर फक्त पैशांसाठी केले आहे. लग्नानंतर त्याने हुंड्यासाठी तेजश्रीचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला सुरुवात केली. इतकंच काय तर त्याचे इतर महिलांसोबत शारीरिक संबंध असल्याचेही तपासात उघड झाले.

निपचित पडले होते शरीर

७ तारखेला जेव्हा तेजश्रीच्या आईने तिला काॅल केला तेव्हा हा काॅल तिने उचलला नाही. नंतर हा काॅल सोमेश्वरने उचलला आणि त्याने सांगितले की, तेजश्रीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. बातमी कळताच आई-वडिल चिंतेत आले आणि त्यांनी लगेचच विशाखापट्टणम येथील सोमेश्वरचं घर गाठलं. तिथे पोहचल्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्याने ते पूर्णपणे हादरुन गेले. तेजश्रीचे शरीर बेडवर निपचित पडले होते आणि तिच्या शरीरावर जखमांचे डाग होते.

Pune Police: स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत ‘संधी’पर्वाचे ‘अवैध धंद्यांना बळ’? गुन्हे शाखेच्या कारवाईने पोलिस दलात खळबळ

कुटुंबाने पतीवर केला आरोप

तेजश्रीच्या आई-वडिलांनी आता आपल्या मुलीच्या खुणाचा आरोप पती सोमेश्वरवर लावत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, सोमेश्वरने आधी त्यांच्या मुलीला मारहाण केली आणि मग गळा दाबून तिची हत्या केली. थ्री टाउन पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, भारतीय न्याय संहितेच्या आधारावर (BNS) कलम ८५, १०८ आणि हुंडा अधिनियमच्या (DPA) कलम ३ आणि ४ च्या नुसार आता या प्रकरणाची नोंद घेण्यात आली आहे. आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आलं असून पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे.

 

Web Title: Visakhapatnam dowry death case after husvband killed wife after two months of marriage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Attempt to Murder
  • crime news

संबंधित बातम्या

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
1

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
2

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
3

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.