Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनयभंगाच्या गुन्ह्यात वानवडी पोलिसांचा जलदगतीने तपास; 24 तासांतच…

वानवडी पोलिसांनी विनयभंगाच्या एका गुन्ह्यात जलदगतीने तपास करून न्यायालयात २४ तासात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2025 | 02:57 PM
विनयभंगाच्या गुन्ह्यात वानवडी पोलिसांचा जलदगतीने तपास; 24 तासांतच...

विनयभंगाच्या गुन्ह्यात वानवडी पोलिसांचा जलदगतीने तपास; 24 तासांतच...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : बोपदेव घाट सामूहिक अत्याचार तसेच स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या प्रकरणानंतर पुणे पोलिसांकडून महिला विषयक गुन्ह्यांबाबत विशेष खबरदारी घेतली जात असून, वानवडी पोलिसांनी विनयभंगाच्या एका गुन्ह्यात जलदगतीने तपास करून न्यायालयात २४ तासात दोषारोपपत्र दाखल केले आहे. विशेष म्हणजे, आरोपीला तातडीने अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. ही घटना २ मार्च २०२५ रोजी रात्री १०:०० ते १०:३० च्या सुमारास घडली होती. पीडित महिला आपल्या वैयक्तिक कामानिमित्त बाहेर असताना आरोपी राहुल संजय मिरेकर (वय १९, रा. रामटेकडी, हडपसर) याने काहीही कारण नसताना तिला अडवले. त्याने पीडितेसोबत अश्लील वर्तन करत शिवीगाळ केली आणि दमदाटी करून विनयभंग केला. यामुळे पीडित महिला घाबरली होती, मात्र तिने धैर्य दाखवत पोलिसांकडे धाव घेतली.

पीडितेच्या तक्रारीनंतर १७ मार्च २०२५ रोजी दुपारी ४:३१ वाजता वानवडी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ७८(२), ७९, ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीने तपास केला. काही तासांतच आरोपीचा शोध घेऊन त्याला त्याच दिवशी रात्री ८:३३ वाजता अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने पूर्ण करून आरोपीला न्यायालयासमोर हजर केले. १८ मार्च २०२५ रोजी अवघ्या २४ तासांत लष्कर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने ते स्वीकारत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली.

याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव आणि त्यांच्या पथकाने अतिशय तत्परतेने पूर्ण केला. पोलिसांनी आवाहन केले असून, कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची भीती न बाळगता त्वरित पोलिसांकडे तक्रार करावी. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभाग सतर्क असून, अशा गुन्ह्यांत कठोर कारवाई केली जाईल, असे म्हंटले आहे.

Web Title: Wanawadi police have expedited the investigation into the crime of molestation nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • Court
  • crime news
  • maharashtra
  • Pune Police

संबंधित बातम्या

Rohit Arya Encounter: पवईत ओलिसनाट्य! आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर; पोलिसांची कारवाई
1

Rohit Arya Encounter: पवईत ओलिसनाट्य! आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर; पोलिसांची कारवाई

सुरक्षारक्षक महिलेजवळ आला, थोडं बोलला अन्…; रांजणगावमधील संतापजनक प्रकार
2

सुरक्षारक्षक महिलेजवळ आला, थोडं बोलला अन्…; रांजणगावमधील संतापजनक प्रकार

Yavatmal City New :- पांढरकवडा आणि उमरखेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई- विनापरवाना रेती वाहून नेणारे पकडले पाच आरोपींना अटक
3

Yavatmal City New :- पांढरकवडा आणि उमरखेडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई- विनापरवाना रेती वाहून नेणारे पकडले पाच आरोपींना अटक

Nilesh Ghaywal : गँगस्टर निलेश गायवळचा ‘जमीनखरेदी साम्राज्य’ उघड; अवघ्या तीन वर्षांत…
4

Nilesh Ghaywal : गँगस्टर निलेश गायवळचा ‘जमीनखरेदी साम्राज्य’ उघड; अवघ्या तीन वर्षांत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.