Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha Crime News: घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर 24 तासांत विवाहितेची हत्या; मोबाईल घेऊन आरोपी फरार

वर्ध्यात घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी 24 वर्षीय मंजू संदीप पचारे हिची भररस्त्यात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. जुनी कामठी परिसरात ही घटना घडली. मंजूने पतीविरोधात घटस्फोट घेतला होता. तिच्या वडिलांनी जावयावर संशय व्यक्त केला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 27, 2026 | 09:24 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घटस्फोटाच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी महिलेची हत्या.
  • हिरणवार गल्लीत भररस्त्यात चाकूने हल्ला करण्यात आला.
  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
वर्धा: वर्धा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी 24 वर्षीय विवाहितेची भररस्त्यात चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वडिलांनी जावयावर संशय व्यक्त केला आहे. घडलेली घटना जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्लीत शुक्रवारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Wardha Crime News)

काय नेमकं घडलं?

मंजू संदीप पचारे (24, मूळ रा. पाचखेड, ता. पुलगाव, जि. वर्धा) असे मृत महिलेचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी मंजूचा विवाह संदीप रामू पचारे याच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर संदीप हा दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करत होता. (Wardha Crime News) यामुळे मंजूने त्याचे घर सोडले. ती आपल्या वडिलांकडे वारीसपुरा, कामठी येथे राहू लागली. मंजूने पती संदीप याच्याविरोधात वर्धा येथील न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या प्रकरणाचा निकाल 25 जून 2026 रोजी लागला. शुक्रवारी सायंकाळी तिची हत्या केली. (Wardha Crime News)

पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला मित्राचा धारदार हत्याराने खून; दोघे एकत्र पार्टीला बसले अन् नंतर अचानक…

मोबाईल घेऊन आरोपी फरार

शुक्रवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मंजू शेतातून काम करून घरी आली. वारीसपुरा येथील घरी डबा ठेवून ती वडिलांसाठी पाण्याची बाटली घेऊन शुक्रवार बाजारातील दुकानाकडे निघाली होती. सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास हिरणवार गल्लीत अज्ञात आरोपीने तिच्या गळ्यावर आणि पोटावर चाकूने सपासप वार केले. मंजू रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपी तिचा मोबाईल घेऊन शुक्रवार बाजाराच्या दिशेने पळून गेला.(Wardha Crime News)

पतीवर संशय

या प्रकरणी मंजूच्या वडिलांनी तिच्या घटस्फोटित पतीवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरु आहे.(Wardha Crime News)

क्रूरतेची परिसीमा! हुंड्यासाठी छळ, मारहाण अन् पत्नीला माहेरी सोडून खाजगी व्हिडिओ केले व्हायरल

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेसोबत संतापजनक घटना घडली आहे. तिच्या पतीने आणि त्याच्या कुटुंबीयांनी विवाहित महिलेचा केवळ शारीरिक आणि मानसिक छळ केला, नाहीतर खाजगी आणि आक्षेपार्ह फोटो तिच्या नातेवाईकांसह मित्रांजवळ प्रसारित केल्याचे समोर आले आहे. या घटनेने आरोपींवर पोलिसांनी कारवाई करत पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ketan Agrawal Murder Case: लोहगड हत्याकांडात उज्वल निकमांची एंट्री; जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची तयारी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत महिलेचे नाव काय आहे?

    Ans: मृत महिलेचे नाव मंजू संदीप पचारे (वय 24) असे आहे.

  • Que: हत्या कुठे झाली?

    Ans: जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरणवार गल्लीत ही घटना घडली.

  • Que: हत्येबाबत कोणावर संशय व्यक्त करण्यात आला आहे?

    Ans: मृत महिलेच्या वडिलांनी तिच्या पतीवर संशय व्यक्त केला आहे.

Web Title: Wardha crime news married woman murdered within 24 hours of divorce verdict accused absconds with mobile phone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 09:24 AM

Topics:  

  • crime
  • wardha
  • Wardha Crime

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा
2

Wardha News : ३२६ वनहक्कधारकांच्या सातबारावर चढणार नाव; आदिवासी-वननिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.