CRIME (फोटो सौजन्य - PINTEREST)
वाशीम: वाशीमच्या कारंजा शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या बापानेच आपल्या पोराचा जीव घेतला आहे. हि घटना कारंजा बायपास रोड वरील प्रगती नगर भागात १२ एप्रिलला सकाळच्या सुमारास घडली असून ही हत्या किरकोळ वादातून करण्यात आल्याचा समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरु केली आहे. मृत मुलाचं नाव अनिल मोकडकर (वय 40) असं असून गोपाल मोखडकर असं आरोपीचं नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नागपुरात ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट; चौघांचा मृत्यू तर 11 कामगार गंभीर जखमी
नेमकं काय प्रकरण?
पुढे आलेल्या माहितीनुसार, गोपाल आणि अनिल मध्ये नेहमी वाद होत होता. मृतक अनिल हा नेहमी मध्यप्रश्न करून घरातील सदस्यांसोबत वाद घालत असायचा. मात्र आज किरकोळ कारणावरून बाप गोपाल आणि अनिलमध्ये वाद निर्माण झाला आणि वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भारत अनिलच्या पोटात चाकू भोसकून हत्या केल्याचे कळते. या घटनेत अनिलच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी हत्यारा बापाला ताब्यात घेतले आहे. वाशिमच्या कारंजा शहरातील कारंजा बायपास भागात आज (१२ एप्रिल) सकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणाची चौकशी कारंजा शहर पोलीस करत आहे. मात्र दुसरीकडे, शेती आणि संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याची जोरदार चर्चा परिसरात रंगत आहे.
शासनाची आर्थिक फसवणूक करून गुन्हेगारी स्वरूपाचा कट, अधिकाऱ्याला अटक
सेवापुस्तिकेत नोंद, जन्मतारखेत खाडाखोड करून दोन वर्षे अधिक सेवा उपभोगून शासनाची आर्थिक फसवणूक करून गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्या प्रकरणी अखेर चौकशीच्या 24व्या दिवशी ‘फ्रॉड’ डीआरटीओ राज बागरी याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याचा जामीन नाकारल्याने शुक्रवारी त्याची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान बागरीच्या न झालेल्या अटकेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी नागपुरातून ताब्यात घेतले होते. मात्र अनेकदा चौकशीस बोलावल्या नंतर त्याला अटक केली नव्हती. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे.