Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime : अमरावती हादरली! पतीला झोपेच्या गोळ्या देऊन पत्नीने संपवलं, अनैतिक प्रेमसंबंधातून प्रियकराच्या मदतीने रचला कट

अमरावतीतून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. त्याच्या चेहऱ्यावर राफ्टरने वार करून त्याला ठार मारण्यात आलं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Sep 04, 2025 | 01:48 PM
crime (फोटो सौजन्य: social media )

crime (फोटो सौजन्य: social media )

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती: अमरावतीतून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. त्याच्या चेहऱ्यावर राफ्टरने वार करून त्याला ठार मारण्यात आलं. ही घटना पथ्रोट येथील झेंडा चौक येथे मंगळवारी रात्री 10:45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृतकाचे नाव अरविंद नजीर सुरत्ने असे आहे. याप्रकरणी पथ्रोट पोलिसांनी ३ सेप्टेंबरला पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास महिलेसह तिच्या प्रियकराविरुद्ध खून व ॲट्रासिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रियकराला मंगळवारी अटक करण्यात आली. तर महिलेला बुधवारी अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली आहे.

अमली पदार्थ खरेदी व्यवहारातून वाद; टोळक्याकडून तरुणांवर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

नेमकं काय घडलं?

अरविंद हा व्यवसायाने चालक आहे. त्याचा प्रेमविवाह झाला होता. तो पत्नी व दोन मुलांसमवेत झेंडा चौक परिसरात भाड्याने राहत होता. २ सप्टेंबर रोजी रात्री ११: ४५च्या सुमारास मृतकाचा मोठा भाऊ फिर्यादी अशोक हे परतवाडा येथे असतांना त्यांच्या भाचा अनिलने त्यांना फोन केला. अरविंद मामा व मामी यांच्यात अमित मिश्रा याच्याशी असलेल्या प्रेमसंबंधामुळे कडाक्याचा वाद झाला. यातूनच हत्या झाल्याचे अनिलने फोनवरून सांगितले. त्या दोघांनीच अरविंदला मारून टाकल्याचे अशोक सुरत्ने यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे. लाकडी राफ्टरने अरविंदच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.

अरविंद यांना 7 व 5 वर्षांची दोन मुले आहेत. त्यांना आपल्या पत्नीच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. दोन दिवसांपूर्वी अरविंद यांच्या घरचे गॅस सिलिंडर संपले होते. त्यावेळी पत्नीच्या प्रियकराने म्हणजे आरोपी अमितने ते भरून आणले होते. ती गोष्टी अरविंद यांना समजल्यानंतर त्यांनी पत्नीला याबाबत जाब विचारला. आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरमुळे त्यांच्यातील वाद अधिक वाढला. २ सप्टेंबरला रात्री अरविंद व त्यांच्या पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. ती बाब तिने आरोपीला सांगितली. आरोपी प्रियकर अरविंदच्या घरी पोहोचला. दोघांनी मिळून अरविंदचा खून केला.अरविंद यांची पत्नी आरोपीकडे स्वयंपाकाचे काम करायची. आरोपी अविवाहित आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने देखील पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. पती पत्नीत आरोपीने आणून दिलेल्या सिलिंडरवरून वाद सुरू झाला होता. मारेकऱ्याला मंगळवारी रात्रीच अटक केली. तर, महिलेला बुधवारी अटक केली. न्यायालयाने दोन्ही आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Ratnagiri Crime: तिहेरी हत्याकांडाने रत्नागिरी हादरली! बारमध्येच रचले खुनाचे कट; सीरिअल किलर अटकेत

Web Title: Wife killed her husband by giving him sleeping pills

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • Amravati crime
  • Amravati Crime News
  • crime

संबंधित बातम्या

Nashik Crime: संतापजनक! डुकरांना त्रास होऊ नये म्हणून कुत्रे-मांजरींना दिले विष, २० पेक्षा जास्त ठार
1

Nashik Crime: संतापजनक! डुकरांना त्रास होऊ नये म्हणून कुत्रे-मांजरींना दिले विष, २० पेक्षा जास्त ठार

Beed Crime: बीडच्या परळीत ५ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, शहरात प्रचंड संताप, हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर, शहर बंद
2

Beed Crime: बीडच्या परळीत ५ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, शहरात प्रचंड संताप, हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर, शहर बंद

Ratnagiri Crime: तिहेरी हत्याकांडाने रत्नागिरी हादरली! बारमध्येच रचले खुनाचे कट; सीरिअल किलर अटकेत
3

Ratnagiri Crime: तिहेरी हत्याकांडाने रत्नागिरी हादरली! बारमध्येच रचले खुनाचे कट; सीरिअल किलर अटकेत

Beed Crime: बीड पुन्हा हादरलं! मित्रानेच २५ वर्षीय मित्राला संपवलं, नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि…
4

Beed Crime: बीड पुन्हा हादरलं! मित्रानेच २५ वर्षीय मित्राला संपवलं, नृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.