Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime : बापरे! पत्नीचा क्रुरावतार, झोपेतच पतीवर उकळतं तेल फेकलं; नंतर जखमांवर लाल तिखटही शिंपडलं

राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली. पत्नीने तिच्या झोपलेल्या पतीवर उकळते तेल ओतले. त्यानंतर तिने त्याच्या जखमांवर मिरची पावडर शिंपडली. या घटनेबद्दल ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 10, 2025 | 12:26 PM
पत्नीचा क्रुरावतार, झोपेतच पतीवर उकळतं तेल फेकलं; नंतर जखमांवर लाल तिखटही शिंपडलं (फोटो सौजन्य-X)

पत्नीचा क्रुरावतार, झोपेतच पतीवर उकळतं तेल फेकलं; नंतर जखमांवर लाल तिखटही शिंपडलं (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:
  • महिलेने तिच्या झोपलेल्या पतीवर उकळते तेल ओतले
  • रागाच्या भरात जखमांवर मिरची पावडर शिंपडली
  • आरोपी पत्नीवर कलम ११८, १२४ आणि ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल

Delhi Crime News in Marathi: देशभरात दररोज अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या संदर्भातील घटना घडल्याच्या बातम्या समोर येतात. आता दिल्लीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या वेळेत एका महिलेने तिच्या झोपलेल्या पतीवर उकळते तेल ओतले. ती तिथेच थांबली नाही तर रागाच्या भरात जखमांवर मिरची पावडर शिंपडली. गंभीर भाजलेल्या पतीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये तो २८ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे, तो जीवाशी झुंजत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

भाजप नेते मामा राजवाडेंना अटक; नाशिक नेमकं झालं काय?

काय आहे नेमकं प्रकरण?

ही हृदयद्रावक घटना दिल्लीच्या मदनगीर परिसरात २ ते ३ ऑक्टोबर दरम्यान रात्री घडली. पीडितेचे नाव दिनेश असे आहे, जो एका औषध कंपनीचा कर्मचारी आहे. पोलीस तक्रारीनुसार, पहाटे ३ वाजताच्या सुमारास दिनेश झोपलेला असताना त्याची पत्नी साधना हिने त्याच्यावर गरम तेल ओतले. घटनेच्या वेळी त्यांची ८ वर्षांची मुलगीही तिथे होती. त्यानंतर तो मोठ्याने ओरडत होता, तरीही पत्नी त्याच्यावर गरम तेल ओतत होती आणि भाजलेल्या जखमांवर वरून लाल मिरची पावडर शिंपडत होती, असा आरोप त्याने केला आहे.

पीडिताने काय म्हटले?

दिनेश म्हणाला, “माझी पत्नी आणि मुलगी जवळच झोपल्या होत्या. पहाटे ३:१५ वाजता अचानक माझ्या संपूर्ण शरीरात तीव्र जळजळ जाणवली. मी माझी पत्नी तिथे उभी असलेली पाहिली, ती माझ्या अंगावर आणि चेहऱ्यावर उकळते तेल ओतत होती. मी उठून मदतीसाठी हाक मारण्यापूर्वीच तिने माझ्या भाजलेल्या भागावर लाल मिरची पावडर शिंपडली. मी विरोध केला तेव्हा, जास्त आरडाओरडा केला तर आणखीन गरम तेल अंगावर ओतेने, अशी धमकीही साधनाने दिली.

प्रत्यक्षदर्शीने काय म्हटले?

जळजळ आणि वेदनांमुळे दिनेश ओरडू लागला तेव्हा शेजारी आणि खालच्या मजल्यावर राहणारे घरमालकाचे कुटुंब घरात आले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. घरमालकाची मुलगी अंजली म्हणाली, “दिनेशच्या पत्नीने आतून दरवाजा बंद केला होता. आम्ही तिला तो उघडण्यास सांगितले. शेवटी दार उघडले तेव्हा आम्हाला तो वेदनेने तडफडत होता आणि त्याची पत्नी आत लपलेली दिसली. त्याची पत्नी साधना हिने त्याला सांगितले की ती तिच्या पतीला रुग्णालयात घेऊन जात आहे. पण जेव्हा ती त्याच्यासोबत बाहेर आली तेव्हा ती विरुद्ध दिशेने गेली. आम्हाला संशय आला. माझ्या वडिलांनी तिला थांबवले, ऑटोची व्यवस्था केली आणि दिनेशला राम सागरसह रुग्णालयात घेऊन गेले.”

Honey Trap Case Video: कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली ?

दिनेशला सुरुवातीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्याच्या छातीवर, चेहऱ्यावर आणि हातावर खोलवर भाजलेले दिसल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सफदरजंग रुग्णालयात पाठवले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय अहवालात दिनेशच्या जखमा गंभीर भाजल्याचे वर्णन केले आहे. दिनेशच्या लग्नाला आठ वर्ष उलटून गेली आहे. दोन वर्षांपूर्वी दिनेशच्या पत्नीने महिला गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली होती, परंतु तडजोडीने हे प्रकरण मिटवण्यात आले. घटनेच्या दिवशी या जोडप्यामध्ये भांडण झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी पत्नीविरुद्ध भादंविच्या कलम ११८, १२४ आणि ३२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: Wife poured boiling oil and red chilli powder on husband in delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2025 | 12:26 PM

Topics:  

  • crime
  • delhi
  • police

संबंधित बातम्या

Pune Crime: पुणे हादरलं! प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रेयसीनं भावासोबत मिळून केला खून; मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळला
1

Pune Crime: पुणे हादरलं! प्रियकराच्या मारहाणीला कंटाळून प्रेयसीनं भावासोबत मिळून केला खून; मृतदेह ब्लॅंकेटमध्ये गुंडाळला

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! प्रेमविवाहाचा घेतला बदला, पाच भावांनी मिळून बहिण आणि भावोजीची केली निर्घृण हत्या
2

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! प्रेमविवाहाचा घेतला बदला, पाच भावांनी मिळून बहिण आणि भावोजीची केली निर्घृण हत्या

Satara Crime: पतीनेच केली पत्नीची हत्या, चारित्र्यच्या संशयावरून डोक्यात घातला हातोडा अन् स्वत:ही घेतला गळफास
3

Satara Crime: पतीनेच केली पत्नीची हत्या, चारित्र्यच्या संशयावरून डोक्यात घातला हातोडा अन् स्वत:ही घेतला गळफास

Delhi crime: पत्नीने चेहऱ्यावर टाकले उकळते तेल, नंतर जखमांवर टाकली मिरची पूड आणि…; पहाटे घडलं धक्कादायक प्रकरण!
4

Delhi crime: पत्नीने चेहऱ्यावर टाकले उकळते तेल, नंतर जखमांवर टाकली मिरची पूड आणि…; पहाटे घडलं धक्कादायक प्रकरण!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.