Mama Rajwade Arrest: भाजप नेते मामा राजवाडेंना अटक; नाशिक नेमकं झालं काय?
Mama Rajwade Arrest: भाजप नेते मामा राजवाडे यांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरकारवाडा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.काल दिवसभर त्यांची चौकशी करण्यात आली, त्यानंतर आज त्यांच्या अटकेची कारवाई सरू झाली आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून काही तासांचे नाशिक शहराध्यक्ष पद भूषवून मामा राजवाडे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या माध्यमातून राजकीय वाटचाल करणाऱ्या राजवाडे यांना गुरुवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये यापुढे सहभागी राहणार नाही, याची खबरदारी घेत प त्यांना इशारा देण्यात आला होता.
Honey Trap Case Video: कोल्हापूरच्या भाजप आमदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न
सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गंभीर गुन्ह्यात मामा राजवाडे यांचा सहभाग असल्याचा पोलीस संशय व्यक्त करत आहेत. या प्रकरणात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे, तर अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैयक्तिक वादातून दोघांवर गोळीबार करून गंभीर मारहाण करण्यात आली होती.
नाशिक शहराचे माजी महानगरप्रमुख आणि ठाकरे गटाचे नेते मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश काही दिवसांपूर्वी झाला होता. त्यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा रंगली होती की, हा पाऊल त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवण्यासाठी घेतले गेलेले आहे.
मामा राजवाडे हे सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वीच पोलिसांनी राजवाडेंना गुन्हे शाखेत बोलावण्यात आले. त्यांची १५ तास चौकशी केल्यानंतरही त्यांना घरी सोडण्यात आले नव्हते. सध्या मामा राजवाडेंवर अटकेची कारवाई सुरू आहे, तर या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील विरोधकांना निवडणुकीत आव्हान देण्यासाठी भाजपने काही महिन्यांपूर्वी सुरु केलेली ‘इनकमिंग’ मोहीम आता वादाचा विषय बनली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक वादग्रस्त नेत्यांचा पक्षप्रवेश झाला होता, मात्र आता या नेत्यांवर पोलिसांची नजर लागल्याने भाजपच्या राजकीय प्रतिष्ठेस धोका निर्माण झाला आहे.
मामा राजवाडेंच्या अटकेने नाशिकच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा पक्षप्रवेश योग्य की अयोग्य यावर नाशिकमध्ये चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.