ऊसाच्या शेतात महिलेचं शीर धडापासून वेगळं (फोटो सौजन्य-X)
Satara Crime News Marathi: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात शुक्रवारी (18 जानेवारी) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारा धक्कादायक घटना उघडकीस आली. तालुक्यातील विडनी गावातील माहितीनुसार अंधश्रद्धेमुळे एका महिलेची हत्या करण्यात आली असून या महिलेचा शीर धडापासून वेगळे केलेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
फलटणच्या विडणी गावात ऊसाच्या शेतात महिलेचे शीर धडावेगळे करून शेजारी एका कापडावर हळदी कुंकू, काळी बाहुली आणि महिलेचे केस सापडल्यामुळे परिसरात अघोरी प्रकारातून खून केल्याची चर्चा आहे. दरम्यान विडणी गावातल्या पंचवीस फाटा जवळील ऊसाच्या शेतात खून करून मृतदेह फेकून देण्यात आला आहे. या परिसरातच अज्ञात महिलेचे अवयव वेगवेगळे केलेला मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, घटनेनंतर गावातील प्रदीप जाधव यांना याची माहिती मिळाली होती. यानंतर त्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर, फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाच्या पंचनाम्याच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे.
प्रदीप जाधव हे फलटण तालुक्यातील विडाणी येथील २५ फाटा परिसराचे मालक आहेत. निर्मनुष्य ठिकाणी काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने एका महिलेचा खून करून मृतदेह उसाच्या शेतात टाकून फरार झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित मृतदेह अर्धवट तसेच सडलेला आहे. हिंस्र प्राण्यांनी कबरेपासून सडलेला भाग उसाच्या शेतातून बाहेर ओढून आणला. तेव्हा शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
पोलीस पाटील शीतल नेरकर यांनी घटनेची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र पाटील, शिवाजी जयपात्रे, शिवानी नागवडे यांनी भेट देऊन परिसरातील उसाच्या शेतात पाहणी केली.
ज्या ठिकाणी महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या ऊसाच्या शेतात काही अंतरावर नारळ, गुलाल, महिलेचे केस कापलेले, तेलाचा दिवा, काळी बाहुली, सुरी आढळून आली. त्यामुळे हा प्रकार नरबळी असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.