सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक हॉटेल बालाजी सरोवर येथे पार पडली. या बैठकीत सोलापूर महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा शिवसेनेला देण्याची मागणी शिंदे गटाच्या नेत्यांनी केलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करून लढण्याचे निर्देश दिल्यानंतर सोलापुरात भाजपा नेत्यांसोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीत सोलापूर महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा शिवसेनेला देण्याची मागणी शिंदे गटाच्या नेत्यांनी मांडली.पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत संपर्कप्रमुख संजय कदम, प्रवक्त्या डॉ ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, अमर पाटील आणि मनीष काळजे यांच्या शिष्टमंडळाने बंद दाराआड सविस्तर चर्चा केली.