मुंबईसाठी महायुतीचे ठरले (फोटो- सोशल मीडिया)
राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू
महायुती व महाविकास आघाडीत मुख्य लढत
मुंबई महापालिकेसाठी महायुतीचे जागावाटप जवळपास पूर्ण
Mahayuti Politics: राज्यात निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीची घोषणा केली आहे. सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात मुंबई महानगरपालिका सर्वात महत्वाची निवडणूक असल्याचे समजले जात आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंची युती अशी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचे जागावाटप ठरल्याचे म्हटले जात आहे.
मुंबई महानगरपालिकेत 207 जागांवर शिवसेना-भाजपचे एकमत झाल्याचे म्हटले जात आहे. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती केली आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटामध्ये निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे.
उर्वरित काही जागांवर तोडगा निघेल असे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. काही जागांबबत बोलणी सुरू असल्याचे समोर आले आहे. अंतिम जागावाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर करतील असे म्हटले जात आहे.
येत्या 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 16 तारखेला निकल जाहीर होणार आहे गेले अनेक दिवस मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीमध्ये जागावाटप चर्चा सुरू होती. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याचा अंदाज आहे.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली आहे. मुंबईत अजून कोणत्याही पक्षाने अधिकृत जागावाटप जाहीर केलेले नाही. त्यामुळे महायुती कदाचित जागावाटप जाहीर करून प्रचारास सुरुवात करण्याची शक्यता आहे.
महायुतीचा भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, पक्षाने बीएमसी निवडणुकीबाबत स्वतःची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे म्हणाले, “गेल्या तीन दिवसांपासून विविध नेत्यांसोबत बैठका झाल्या आहेत. या बैठकांचे निकाल अजित पवार यांना आधीच कळवण्यात आले आहेत आणि ३० डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादी किती जागा लढवणार हे स्पष्ट होईल. ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अंतिम यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.






