कल्याण डोंबिवली येथील दोन्ही सभा आटोपल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी नगरसेवक महेश गायकवाड आयोजित कल्याण महोत्सवात उपस्थित राहिले. यावेळी शिंदे यांनी महेश गायकवाड यांच्या कार्यकर्तृत्वाचे भरभरून कौतुक केले. “कार्यकर्ता कसा असावा तर महेश गायकवाडसारखा असावा,” असे सांगत त्यांनी महेश गायकवाड यांच्या शिवसेनेतील निष्ठेची प्रशंसा केली. युतीधर्म पाळल्यामुळे महेश गायकवाड एकटे लढले, मात्र त्यांनी कधीही जनतेचे काम सोडले नाही, असे शिंदे म्हणाले.