वसतिगृहात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू; वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
पुणे : कोथरूड येथील एका उच्चभ्रु सोसायटीत राहत असलेल्या ज्येष्ठ महिला राहत्या घरात जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. महिलेने आत्महत्या केल्याचा संशय असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. कमल संपतराव घुगे (वय ७६) असे मृतावस्थेत सापडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांत घटनेची नोंद केली आहे.
गुरूगणेशननगर परिसरात असलेल्या सोसायटीत कमल घुगे राहायला आहेत. सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास रहिवांशांना घुगे यांच्या फ्लॅटमधून धूर येत असल्याची दिसले. ही माहिती रहिवाशांनी अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. फ्लॅटचा दरवाजा उघडला. तेव्हा घुगे गंभीरिरत्या होरपळल्या होत्या. तर, आग लागलेली होती. घुगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
घुगे एकट्या फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होत्या, असे अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांनी सांगितले. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी देखील येथे धाव घेऊन पाहणी केली. घुगे यांनी पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.