Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाटस गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 10 आरोपींना अटक; माजी सरपंचांचे ट्रान्सपोर्ट ऑफिस वादाच्या केंद्रस्थानी!

सिमेंट वाहतूक करणारी वाहने भरण्याच्या वादातून भरदिवसा झालेल्या हाणामारी आणि गोळीबार प्रकरणात यवत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील तब्बल १८ जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 06, 2026 | 05:04 PM
पाटस गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 10 आरोपींना अटक; माजी सरपंचांचे ट्रान्सपोर्ट ऑफिस वादाच्या केंद्रस्थानी!

पाटस गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, 10 आरोपींना अटक; माजी सरपंचांचे ट्रान्सपोर्ट ऑफिस वादाच्या केंद्रस्थानी!

Follow Us
Follow Us:

पाटस : सिमेंट वाहतूक करणारी वाहने भरण्याच्या वादातून भरदिवसा झालेल्या हाणामारी आणि गोळीबार प्रकरणात यवत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन्ही गटातील तब्बल १८ जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी १० आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी ( दि. ५ जून ) रोजी पाटस येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लक्ष्मी बापू गरदडे कॉम्प्लेक्स समोर दुपारी तुफान राडा झाला. श्री सिमेंट कंपनीत ट्रक भरण्याच्या कारणावरून “कडू गट” आणि “कु-हाडकर गट” आमने-सामने आले. वाद विकोपाला जाऊन लोखंडी गज आणि दगडांनी डोक्यात मारहाण झाली. यानंतर गावठी पिस्तूलमधून ३ राऊंड हवेत फायर करण्यात आले होते.

 

घटनेनंतर यवत पोलीस, पाटस पोलीस आणि ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्त मोहीम राबवली. आरोपींना उसाच्या शेतातून आणि इतर भागातून शोधून १० जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही गटांकडून परस्पर तक्रार दाखल झाल्याने एकूण १८ जणांवर यवत पोलीस ठाण्यात BNS कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये कडू गटाचे संतोष बाळकृष्ण कडू ( रा. बेटवाडी ता. दौंड जि‌. पुणे ), आण्णा बाबू गायकवाड, रावसाहेब गंगाराम पालवे, सुधीर आण्णा फुलमाळी, रामा बाजीराव गायकवाड, अनिल रामा गायकवाड (सर्व रा. जोशीवस्ती ढोकराई फाटा ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर) व इतर 4 ते 5 अनोळखी. तर कु-हाडकर गटाचे सूरज राजेंद्र कु-हाडकर, अजय धोत्रे, श्रीकांत पवार, अनिल चव्हाण (सर्व रा. अंबिकानगर पाटस ता‌.दौंड जि.पुणे ) व इतर 3 ते 4 अनोळखी आहेत.

सूरज कु-हाडकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वाद मिटवण्यासाठी चर्चेसाठी बसले असताना बेकायदेशीर जमा जमवून लोखंडी गदाने व दगडाने डोक्यात मारहाण करून जखमी करून शिवीगाळ, दमदाटी केली तर भांडणे मिटवण्यासाठी चर्चेसाठी बोलावून घेऊन शिवीगाळ दमटाटी करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अजय धोत्रे याने गावठी कट्टयाने संतोष कडूच्या दिशेने गोळीबार केला. अशी फिर्याद संतोष कडू यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, या घटनेने नवीन वळण घेतले आहे. लक्ष्मी बापू गरदडे कॉम्प्लेक्समध्येच पाटसच्या एका माजी सरपंचांचे सिमेंट कंपनीच्या वाहनांचे ट्रान्सपोर्ट कार्यालय आहे. आरोपी याच कार्यालयात आले होते का? वादाची ठिणगी इथूनच पडली का? सिमेंट कंपनीचा ट्रान्सपोर्ट करणारा ठेकेदारच या गोळीबाराचा मुख्य सूत्रधार आहे का? श्रीगोंदा तालुक्यातील गुंडप्रवृत्तीची टोळी कोणी बोलावली होती? असे अनेक प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोल्हे हे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. आणखी आरोपी आहेत का याचा शोध सुरू आहे. दरम्यान, पाटस ग्रामस्थांनी पोलिसांकडे निपक्षपाती आणि पारदर्शक तपास करून खरे मुखवटे उघड करावेत अशी मागणी केली आहे.

हे सुद्धा वाचा : वसतिगृहाच्या टेरेसवर झोपलेल्या विद्यार्थ्याचा खून; लोखंडी पाईप अन् सिमेंटच्या गट्ट्याने वार करुन संपवलं

गोळीबारानंतर पाटसमध्ये निर्माण झालेला तणाव आता पोलिसांच्या कारवाईने काहीसा कमी झाला आहे. मात्र ट्रान्सपोर्ट, सिमेंट लॉबी आणि गुन्हेगारी यांचा संबंध समोर आल्याने गावात चर्चेचा विषय बनला आहे. ह्या प्रकरणाच्या मुळाशी असलेले ट्रान्सपोर्ट आणि कॉन्टॅक्टर चे राजकारण उघडे होणे गरजेचे आहे. सध्या सिमेंट कंपनीतील वाढती गुन्हेगारी पाटसकरांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.

Web Title: Yavat police have taken major action in the patas firing case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 05:04 PM

Topics:  

  • crime news
  • Patas News

संबंधित बातम्या

आळे परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
1

आळे परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपुरात खळबळ! नगरसेविकेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, इन्स्टाग्रामवर बदनामी करण्याचा प्रयत्न
2

श्रीरामपुरात खळबळ! नगरसेविकेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, इन्स्टाग्रामवर बदनामी करण्याचा प्रयत्न

12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, सतर्कतेमुळे चिमुरडी बचावली; भोरमधील संतापजनक प्रकार
3

12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, सतर्कतेमुळे चिमुरडी बचावली; भोरमधील संतापजनक प्रकार

Nilanga Murder : शेतीच्या वादातून चुलत्याचा निघृण खून; दगड व काठीने मारहाण करुन जागेवरच संपवलं
4

Nilanga Murder : शेतीच्या वादातून चुलत्याचा निघृण खून; दगड व काठीने मारहाण करुन जागेवरच संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.