Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, सतर्कतेमुळे चिमुरडी बचावली; भोरमधील संतापजनक प्रकार

एक संतापजनक बातमी समोर आली आहे. भोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 18, 2026 | 04:20 PM
12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, सतर्कतेमुळे चिमुरडी बचावली; भोरमधील संतापजनक प्रकार

12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न, सतर्कतेमुळे चिमुरडी बचावली; भोरमधील संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

​भोर : राज्यासह देशभरात अत्याच्याराच्या घटना वाढल्या असून, अशातच आता एक संतापजनक बातमी समोर आली आहे. भोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात बोलावून अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ती नराधमाच्या तावडीतून सुदैवाने बचावली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अविनाश रवींद्र गायकवाड (वय ३४) याला शिरवळ येथून अटक केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शुक्रवार (दि.३) रोजी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. या दरम्यान आरोपी अविनाश गायकवाड याने तिला गाठले आणि “तुझे वडील आमच्या घरी बसले आहेत,” अशी बतावणी करून तिला विश्वासात घेऊन आपल्या घरात बोलावले. घरात नेल्यानंतर त्याने मुलीला जबरदस्तीने विवस्त्र करुन बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र संकटात सापडलेल्या मुलीने घाबरून न जाता समयसूचकता दाखवली. तिने आरोपीला “मी किचनमधून पाणी पिऊन येते,” असे सांगून वेळ मारून नेली आणि किचनच्या दरवाज्यातून पळ काढला. या धाडसामुळे ती नराधमाच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडली.

हे सुद्धा वाचा : 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील

या घटनेनंतर पीडित मुलीच्या आईने बुधवार (दि. १५) रोजी भोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपीचा शोध सुरू केला आणि त्याला शिरवळ येथून ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शीला खोत करत आहेत. या घटनेबाबत भोर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नीलेश माने म्हणाले की, “ही घटना अत्यंत संतापजनक आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आमचे पथक सतर्क आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जात असून, त्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’बाबत सविस्तर माहिती दिली जात आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांशी संवाद साधावा.

हे सुद्धा वाचा : शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार? तब्बल 73.52 कोटींच्या उड्डाणपुलाला हिरवा कंदील

चॉकलेटच्या बहाण्याने 15 वर्षीय मुलीवर अत्याचार

लातूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुखेड तालुक्यातील १५ वर्षीय मुलीवर चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १० जुलै रोजी सकाळी साडेसात ते साडेनऊच्या दरम्यान घडली आहे.

Web Title: The police have arrested the accused who molested a girl in bhor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Arrested News
  • Bhor Crime
  • crime news

संबंधित बातम्या

Nilanga Murder : शेतीच्या वादातून चुलत्याचा निघृण खून; दगड व काठीने मारहाण करुन जागेवरच संपवलं
1

Nilanga Murder : शेतीच्या वादातून चुलत्याचा निघृण खून; दगड व काठीने मारहाण करुन जागेवरच संपवलं

न्यायालयाच्या गेटवरच पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; बाटलीने पेट्रोल अंगावर टाकलं अन्…
2

न्यायालयाच्या गेटवरच पत्नीला जाळण्याचा प्रयत्न; बाटलीने पेट्रोल अंगावर टाकलं अन्…

Pune Sucide News : पुण्यात गॅलरीतून उडी मारून मुलीची आत्महत्या; घरातील सर्वजण झोपले अन्…
3

Pune Sucide News : पुण्यात गॅलरीतून उडी मारून मुलीची आत्महत्या; घरातील सर्वजण झोपले अन्…

UP Crime : एक वर्ष केली फुल प्रुफ प्लॅनिंग, पत्नीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने काढला पतीचा काटा; सापाच्या दंशाने केली हत्या
4

UP Crime : एक वर्ष केली फुल प्रुफ प्लॅनिंग, पत्नीने बाॅयफ्रेंडच्या मदतीने काढला पतीचा काटा; सापाच्या दंशाने केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.