Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आळे परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

आळे परिसरातील कैचान मळा, हेमंत ढाबा वस्ती येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला; मात्र तो शाळेतच पोहोचला नसल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 18, 2026 | 06:52 PM
आळे परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

आळे परिसरातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : आळे परिसरातील कैचान मळा, हेमंत ढाबा वस्ती येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला; मात्र तो शाळेतच पोहोचला नसल्याचे उघड झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर सिताराम इथापे (वय ४३,रा.कैचान मळा,हेमंतढाबा वस्ती, आळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा मुलगा कल्पेश सुधीर इथापे (वय १५) हा १३ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजता शाळेचा गणवेश परिधान करून घरातून निघाला होता. मात्र नंतर ज्ञानमंदिर विद्यालयातील शिक्षिकेने फोन करून तो २७ जूनपासून शाळेत येत नसल्याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला.

शोधादरम्यान सायंकाळी कांदा मार्केट, आळे परिसरातील एका बंद बंगल्याजवळ मुलाची सायकल आढळून आली. नातेवाईक, मित्र आणि परिसरात शोध घेऊनही मुलगा सापडला नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून अल्पवयीन मुलाला फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद वडिलांनी दिली.

मुलाचे वर्णन उंची सुमारे ५ फूट, मध्यम बांधा, गोरा रंग, काळे लहान केस. अंगात ज्ञानमंदिर विद्यालयाचा गणवेश (निळी पँट व लाल-निळ्या-ग्रे चेक्सचा शर्ट), पायात काळ्या रंगाची चप्पल असे आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम घांटे हे पुढील तपास करीत आहे.

हे सुद्धा वाचा : 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील

दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने वार

अमरावतीमधून एक थरकाप उडवणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी घटना समोर आली आहे. शहरात एका २४ वर्षीय तरुणाची भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून अत्यंत निघृण हत्या करण्यात आली. प्रेमप्रकरणाच्या वादातून अत्यंत क्रूरतेने घडवून आणलेल्या या हत्याकांडात हल्लेखोरांनी तरुणाचा हाताचा पंजाही शरीरापासून वेगळा केला. या अंगावर काटा आणणाऱ्या भीषण घटनेचा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या डिजिटल पुराव्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. मृताची ओळख पटली असून, शेख अफाक शेख अकिल (२४) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Web Title: An incident involving the kidnapping of a minor boy has occurred in the ale area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 06:52 PM

Topics:  

  • crime news
  • Kidnaped Case
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन
1

Bhandara News: फवारणीच्या विषबाधेने मृत्यू नाही; दोन शेतकरी किरकोळ अस्वस्थ! कृषी विभागाने केले फवारणीचे योग्य नियोजन

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र
2

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
3

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता
4

Mumbai News: 200 हून अधिक सफाई कर्मचाऱ्यांची फौज मैदानात; वरळी समुद्रकिनाऱ्यासह कोळीवाड्याची व्यापक स्वच्छता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.