
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
घडलेली घटना आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे घडली. आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव चेतना मनोज जाधव असे आहे. चेतनाचा पती मनोज जाधव याने एका मित्राला जेवणासाठी घरी बोलावले होते. ‘मटणाची भाजी बेतशीर आणि चांगली कर,’ अशी सूचना त्याने पत्नीला दिली होती. अंगणात जेवणाचा बेत रंगला होता पण पाहुण्यासमोरच मनोजचा पारा चढला. मटण व्यवस्थित शिजले नसल्याच्या कारणावरून त्याने पत्नीशी जोरदार वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित राहिला नाही, तर त्यात मनोजच्या जुन्या संशयी स्वभावाचा आणि व्यसनाचा तडका लागला. मनोजने चेतनाला बेदम मारहाण केली. यामुळे चेतना अत्यंत दुखावली गेली.
रस्त्याने पायी चाललेल्या तरुणाला अडविले, धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
याच दुःखातून आणि नैराश्यातून चेतनाने टोकाचा पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. भरल्या ताटावरून उठून ती आत गेली आणि तिने विषारी औषध प्राशन केले. बाहेर येऊन तिने पतीला ही बाब सांगितली तेव्हा एकच खळबळ उडाली. चेतनाला तातडीने आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.
मनोजला अटक
याप्रकरणी चेतनाचे मामा मनोहर राठोड, रा. देवगाव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चेतनाचा पती मनोज जाधव याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करून त्यास अटक केली. चेतनाच्या मृत्यूनंतर आर्णी ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी केलेली गर्दी आणि त्यांचा आक्रोश काळजाला पिळवटून टाकणारा होता.
मनोजवर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल
मनोज हा दारूच्या आहारी गेला होता. त्याच्यावर २०१५ मध्ये कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला होता. २०१७ मध्ये ‘पुन्हा सुखाने संसार करू’ या अटीवर चेतनाने त्याला माफ केले होते. मात्र बुधवारी मनोजने सर्वांसमोर अपमान केल्याने दुखावल्या गेलेल्या चेतनाने आत्महत्या केली. चेतना आणि मनोज यांच्या संसारवेलीवर मुलगा लेख आणि मुलगी अन्वी अशी दोन मुले आहेत. मात्र वडिलांच्या तापट स्वभावाने दोन्ही मुले आईच्या प्रेमास पोरकी झाली आहे. ज्या बापाने घराचे रक्षण करायचे, त्याच बापाच्या संतापाने या मुलांच्या आयुष्यात कायमचा अंधार पसरवला आहे.
Ans: यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील बोरगाव येथे.
Ans: मटण नीट शिजले नाही यावरून झालेला वाद आणि सार्वजनिक अपमान.
Ans: पती मनोज जाधव याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.