Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palm Beach Road Accident: पाम बीच रोडवरील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; दोन चारचाकी वाहन चालकांवर गुन्हा

नवी मुंबईतील पाम बीच रोडवर झालेल्या भीषण अपघातात प्रशांत जमदाडेचा मृत्यू झाला होता. सानपाडा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे स्कोडा व ब्रेझा चालकांवर कारवाई केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 15, 2026 | 08:22 PM
पाम बीच रोडवरील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

पाम बीच रोडवरील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Follow Us
Follow Us:

 

  • पाम बीच रोडवरील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू
  • दोन चारचाकी वाहन चालकांवर गुन्हा
सावन वैश्य | नवी मुंबई : पाम बीच रोडवरील केसर सॉलिटेअर समोर 3 मार्च 2026 रोजी झालेल्या भीषण अपघातात 23 वर्षीय प्रशांत विजय जमदाडे याचा मृत्यू झाला असून त्याच्यासोबत प्रवास करणारी हरमन कौर ही महिला गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन चारचाकी वाहन चालकांना आरोपी ठरवत त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत जमदाडे आणि हरमन कौर हे दोघेही अपाचे स्पोर्ट मोटारसायकलवरून पाम बीच रोडवरून प्रवास करत होते. सरसोळे सिग्नल, नेरूळ येथील तसेच पाम बीच रोडवरील विविध सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता मोटारसायकल वेगात असल्याचे दिसून आले.

या फुटेजमध्ये मोटारसायकलच्या सुमारे 30 सेकंदांनंतर एक मालवाहू टेम्पो तसेच दोन चारचाकी वाहने निळ्या रंगाची स्कोडा कार क्रमांक MH43CQ7559 आणि मारुती सुझुकी ब्रेझा क्रमांक MH43BK8571 त्या मार्गावरून जाताना दिसून आली. विशेष म्हणजे स्कोडा कंपनीची ही निळ्या रंगाची कार नवी मुंबई परिसरात अत्यंत दुर्मिळ मानली जात असून शंभर वाहनांपैकी एक अशी मर्यादित (लिमिटेड) स्वरूपातील असल्याची माहिती समोर आली आहे. मालवाहू टेम्पो चालकाचा जबाब नोंदवला असता, केसर सॉलिटेअर समोर येण्यापूर्वी रस्त्यावर एक पुरुष व एक महिला अपघातग्रस्त अवस्थेत पडलेले दिसल्याचे त्याने सांगितले.

Crime News: मुंबईत गॅस सिलिंडरचा काळाबाजार! शहरात १०० हून अधिक LPG सिलिंडर जप्त, दोघांविरोधात केला गुन्हा दाखल

सरसोळे सिग्नल ते अपघातस्थळ या दरम्यान अंदाजे 700 ते 800 मीटर अंतर आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या मार्गावरून वेगाने गेलेल्या दोन्ही चारचाकी वाहनांचा शोध घेतला. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने संबंधित वाहनांची तपासणी करण्यात आली.

सध्या स्कोडा (MH43CQ7559) आणि ब्रेझा (MH43BK8571) ही दोन्ही वाहने तपासासाठी सानपाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल मुंडे करत आहेत.

तपासात स्कोडा चालक सागर सांडा आणि ब्रेझा चालक कृष्ण रावरीया यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. मात्र, घटनेच्या वेळी ही वाहने त्या मार्गावरून जात असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले असले तरी या अपघातात त्यांचा नेमका कितपत दोष आहे हे पुढील तपासातून स्पष्ट होणार असून अंतिम निर्णय न्यायालयातच होणार आहे.

प्रेयसीच्या फोनवरुन मेसेज आला, तरुण कोथरुडला भेटायला गेला अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

Web Title: Young man dies in horrific accident on palm beach road case registered against two car drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • Accident
  • crime news
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?
1

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?

धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; ‘तो’ मेसेज आला अन्…
2

धक्कादायक ! व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक करून तब्बल 98.50 लाखांची फसवणूक; ‘तो’ मेसेज आला अन्…

बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट
3

बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप
4

AAP नेता नंदिनी बोसमियाने गळफास घेत संपवले आयुष्य, लिव्ह-इन-पार्टनर असलम हुसैनवर हत्येचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.