Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाईतील तरुण ऑनलाइन गेमच्या विळख्यात; नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न

वाईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. शहरातील तरुण पिढी ऑनलाइन गेमिंग आणि जुगाराच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून, लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 30, 2025 | 12:45 PM
वाईतील तरुण ऑनलाइन गेमच्या विळख्यात; नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न

वाईतील तरुण ऑनलाइन गेमच्या विळख्यात; नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न

Follow Us
Close
Follow Us:

वाई : सुसंस्कृत आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. शहरातील तरुण पिढी ऑनलाइन गेमिंग आणि जुगाराच्या विळख्यात अडकून बरबाद होत असून, लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या खेळात पैसे गमावल्याच्या नैराश्यातून काही तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वाई, शहर आणि परिसरात ऑनलाइन गेमिंगचे व्यसन वेगाने पसरत आहे. कॉलेजचे तरुण-तरुणी, विशेषतः ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी, शहरातील झगमगाटाला भुलून या व्यसनाच्या आहारी जात आहेत. पान टपऱ्या आणि कॅफेमध्ये सहज उपलब्ध असलेल्या या ऑनलाईन जुगारावर तरुण लाखो रुपये उधळत आहेत. पैसे गमावल्याने अनेकजण कर्जबाजारी होत असून, व्यसनाधीनतेच्या मार्गाला लागले आहेत. एकीकडे ऑनलाइन जुगाराने थैमान घातले असताना, दुसरीकडे शहरात पारंपरिक जुगाराचे अड्डेही राजरोसपणे सुरू आहेत.

पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर अड्डे

वाई पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हे अड्डे चालत असले, तरी पोलीस त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पोलिस केवळ शहराबाहेरील अड्ड्यांवर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेत आहेत. या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास तरुण पिढीचे भविष्य अंधारात जाईल, अशी भीती व्यक्त होत असून, पोलिसांनी यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

गेमवर तब्बल दीड कोटी उडवले

एक धक्कादायक प्रकार तालुक्यातील एका गावात घडला आहे. एका युवकाने ऑनलाइन गेममध्ये पैसे गमावल्याच्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या युवकाने ऑनलाइन गेमवर तब्बल दीड कोटी रूपये उडवले आहेत. यातूनच त्याच्यावर लाखोंचे कर्ज झाल्याने त्याने हे पाऊल उचलले. तो आजही मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे तरूण पिढीने ऑनलाइन गेम्सच्या फंदात पडू नये, असे आवाहन केले जात आहे.

Web Title: Young people in wai are getting wasted playing online games

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Sucide News
  • Vai News

संबंधित बातम्या

1993 Bomb Blast: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषीसाठी दयेची मागणी; भाजप नेत्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्तांना पत्र
1

1993 Bomb Blast: १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषीसाठी दयेची मागणी; भाजप नेत्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्तांना पत्र

‘समजलं तर ठीक, नाहीतर पुढच्यावेळी सरळ गोळी…’, कॅनडात पंजाबी गायक तेजी कहलोंवर गोळीबार, रोहित गोदारा गँगची दहशत
2

‘समजलं तर ठीक, नाहीतर पुढच्यावेळी सरळ गोळी…’, कॅनडात पंजाबी गायक तेजी कहलोंवर गोळीबार, रोहित गोदारा गँगची दहशत

चोरट्यांच्या दिवाळीवर फिरले पाणी! पोलिसांनी एकाच दिवसात केला 3 घरफोड्यांचा केला पर्दाफाश, तब्बल…
3

चोरट्यांच्या दिवाळीवर फिरले पाणी! पोलिसांनी एकाच दिवसात केला 3 घरफोड्यांचा केला पर्दाफाश, तब्बल…

माणुसकीचा मर्डर! भर रस्त्यात Driver ला दगड, विटांनी ठेचून मारलं; कुटुंबाने हायवे जाम केला अन् थेट गाड्यांची…
4

माणुसकीचा मर्डर! भर रस्त्यात Driver ला दगड, विटांनी ठेचून मारलं; कुटुंबाने हायवे जाम केला अन् थेट गाड्यांची…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.