Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण; रत्नागिरीतील राजीवडा पूल येथील घटना

फिर्यादी अरमान होडेकर आणि संशयित आरोपी एकाच परिसरातील रहिवासी असून, एकमेकांच्या परिचयाचे आहेत. या वादाचे मूळ जैतापूर येथील एका सामायिक मैत्रिणीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 29, 2026 | 01:17 PM
जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

जुन्या वादातून तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण

Follow Us
Close
Follow Us:

रत्नागिरी : शहरातील राजीवडा पुलाखालील परिसरात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणाला जुन्या वादातून आणि संशयातून चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. गुरुवारी (दि.२६) रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अरमान नझीर होडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रत्नागिरी शहर पोलिसांत रमजान नवाज मिरकर, साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत.

फिर्यादी अरमान होडेकर आणि संशयित आरोपी एकाच परिसरातील रहिवासी असून, एकमेकांच्या परिचयाचे आहेत. या वादाचे मूळ जैतापूर येथील एका सामायिक मैत्रिणीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. संबंधित मैत्रिणीने रमजान मिरकर याचे काही सामान फिर्यादी अरमानकडे दिले होते. हे सामान पोहोचवत असताना फिर्यादी हा त्या तरुणीला का भेटतो आणि तिच्याशी का बोलतो, असा संशय रमजान मिरकर याने मनात धरला होता. याच रागातून त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, ज्याचे रूपांतर पुढे हिंसक हाणामारीत झाले.

हेदेखील वाचा : Pune Crime: नोकरी गेल्याचा ताण ! गजबजलेल्या एफसी रोडवर व्यक्तीने गळ्यावर ब्लेडने केला वार; काय घडलं नेमकं?

या वादावेळी रमजान नवाज मिरकर याला साजिद बावा मिरकर, अझरुद्दीन अलीमिया मुजावर आणि महम्मद बावा मिरकर यांनी साथ दिली. या चौघांनी मिळून फिर्यादी अरमान याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. लाथाबुक्क्यांसह लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने त्याच्या पाठीवर, कमरेवर व उजव्या पायावर जबर प्रहार करून त्याला गंभीर दुखापत केली.

चिव्याच्या काठीने बेदम मारहाण

दुसरीकडे, संगमेश्वर तालुक्यातील पोचरी खालची देसाईवाडी येथे किरकोळ वादातून एका तरुणाला चिव्याच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी दोन नातेवाईकांसह अन्य दोन अनोळखी इसमांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: Youth beaten with iron rod over old dispute in ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • crime news
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

आरपीआयच्या पदाधिकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या, मोशीतील घटनेनं खळबळ; कार्यकर्ते संतापले
1

आरपीआयच्या पदाधिकाऱ्याची चाकूने भोसकून हत्या, मोशीतील घटनेनं खळबळ; कार्यकर्ते संतापले

धक्कादायक ! येरवडा कारागृहातून आणखी एक कैदी पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
2

धक्कादायक ! येरवडा कारागृहातून आणखी एक कैदी पळाला; कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्य
3

सुनेला तोकडे कपडे अन् रिल बनवण्याचा नाद, कुटुंबात कलह; सासू सासऱ्यांनी विषारी पदार्थ खाऊन संपवले आयुष्य

Crime News: आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा; सिडको परिसरातून दोघांना अटक, ‘गट्ट्या रोमियो’चा शोध सुरू
4

Crime News: आयपीएल सट्टेबाजीवर पोलिसांचा छापा; सिडको परिसरातून दोघांना अटक, ‘गट्ट्या रोमियो’चा शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.