Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मयत गोविंद हा दारू पिऊन आरोपींच्या खोलीमध्ये आला. तिथे त्याने शिवीगाळ करत मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. तो मोबाईल चोरत असल्याचा समज करून आरोपी आकाश सोनवणे आणि बुद्धभूषण ऊर्फ मयूर मोकळे यांनी त्याला लाथाबुक्क्या व बॅटने बेदम मारहाण केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 02, 2026 | 12:10 PM
चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण; गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू

Follow Us
Follow Us:

पिंपरी : मोबाईल चोरत असल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.३०) रात्री एक वाजण्याच्या सुमारास चाकण येथील आंबेठाण चौकाजवळील संकल्प हॉटेलजवळ ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

गोविंद शिवनारायण ढगे (वय २४, रा. चाकण) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ख्वाजा जमालउद्दीन शेख (वय २३, रा.आंबेठाण चौक, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश रवी सोनवणे (वय २५) आणि बुद्धभूषण उर्फ मयूर मुकुंद मोकळे (वय २३, दोघे सध्या रा. आंबेठाण चौक, चाकण, मूळ रा. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गोविंद ढगे, फिर्यादी खाजा शेख आणि आरोपी हे चाकण येथील आंबेठाण चौक परिसरात राहतात. मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मयत गोविंद हा दारू पिऊन आरोपींच्या खोलीमध्ये आला. तिथे त्याने शिवीगाळ करत मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला. तो मोबाईल चोरत असल्याचा समज करून आरोपी आकाश सोनवणे आणि बुद्धभूषण ऊर्फ मयूर मोकळे यांनी त्याला लाथाबुक्क्या व बॅटने बेदम मारहाण केली.

मारहाणीत झाला गंभीर जखमी

या मारहाणीत संबंधित तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर घरी जाऊन झोपला असता तो बेशुद्ध झाला. फिर्यादी यांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना अटक केली असून, चाकण उत्तर पोलीस तपास करत आहेत.

पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर

दुसरीकडे, दारू पिताना पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद एका मजुराच्या निर्घृण हत्येपर्यंत जाऊन पोहोचला आहे. कांचनवाडी परिसरातील वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात तिघा मित्रांनी मिळून राजू किसन वंजारी (वय ३३, रा. गौतमनगर) यांना बेदम मारहाण करत त्यांचे डोके झाडावर आपटले. गंभीर जखमी झालेल्या राजू यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी काही तासांत तपास पूर्ण करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला

Web Title: Youth critically injured in assault finally dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Murder Case
  • Pimpri News
  • Theft Case

संबंधित बातम्या

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या
1

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL
2

चोरांमध्येही PM मोदींची क्रेझ! पंतप्रधानांचा मुखवटा घालून लाखो रुपयांचे स्मार्टफोन लंपास केले; पाहून पोलिसही चक्रावले, VIDEO VIRAL

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार
3

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार

संभाजीनगर हादरलं! रॅप साँगच्या वादातून तरुणाचा निघृण खून; चाकू अन् सिमेंटच्या गट्ट्याने संपवलं
4

संभाजीनगर हादरलं! रॅप साँगच्या वादातून तरुणाचा निघृण खून; चाकू अन् सिमेंटच्या गट्ट्याने संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.