मोदींना ७५ वर्षांचा नियम का लागू नाही? अरविंद केजरीवालांनी सरसंघचालक भागवतांना विचारले 'हे' ५ प्रश्न
दिल्ली: दिल्ली दारू धोरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची १३ सप्टेंबरला तिहार तुरुंगातून सुटका झाली. त्यांनी १५ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिलीच जाहीर सभा घेतली आहे. या सभेतून त्यांनी भाजप, नरेंद्र मोदी, केंद्र सरकार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना ५ महत्वाचे प्रश्न देखील विचारले आहेत.
“या नेत्यांना (भाजपला) केसेस आणि खटल्यांची पर्वा नाही, त्यांची चामडी जाड आहे. पण मी तसा नाही. मी नेता नाही, माझी चामडी जाड नाही. मला चोर आणि भ्रष्टचारी म्हटले की मला फरक पडतो, म्हणूनच मी आज खूप दुखी आहे. माझ्या मनाला खूप वेदना होत आहेत. म्हणून मी राजीनामा दिला, असे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लील जंतरमंतर मैदानावर आयोजित ‘जनता की अदालत सभेत बोलताना केजरीवालांनी भागवतांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
१. ज्या प्रकारे नरेंद्र मोदी हे लालूच देऊन किंवा ईडी-सीबीआयच्या मदतीने दुसरा पक्ष फोडत आहेत. सरकार पाडत आहेत. हे देशातील लोकतंत्रासाठी योग्य आहे का?
२. देशभरातील अनेक भ्रष्टाचारी नेत्यांना मोदींनी आपल्या पक्षात घेतले आहे. यामध्ये तर काही नेते असे आहेत की ज्यांच्यावर भाजप व मोदींकडून भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना भाजपचे हे राजकारण मान्य आहे का?
३. भाजप हे संघाच्या मुशीत तयार झाले आहे, असे बोलले जाते. भाजप भार्षेत होणार नाही याची काळजी घेणे आरएसएसची जबाबदारी आहे. आज भाजप ज्या पद्धतीने वागत आहे ते मोहन भागवताना पटते आहे का?
४. भाजपला आता आरएसएसची गरज नाही असे जेपी नड्डा लोकसभा निडवणुकीत म्हणाले होते. आरएसएस तर भाजपसाठी आईसमान आहे. मग मुलगा एवढा मोठा झाला का की तो आईलाच डोळे दाखवू लागला आहे? हे योग्य आहे का?
५. तुम्ही सगळ्यांनी मिळून एक नियम तयार केला होता की, ७५ वर्षे वय पूर्ण झाले की नेते निवृत्त होतील. या नियमप्रमाणे आडवाणी, मुरली मनोहर जोशी निवृत्त झाले. मग हा नियम मोदींना लागू होत नाही का ?
RSS प्रमुख श्री मोहन भागवत जी से मैं ये 5 सवाल पूछना चाहता हूं। pic.twitter.com/ZGVGiYj3F3
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 22, 2024
मी माझ्या आयुष्यात फक्त आदर आणि प्रामाणिकपणा कमावला आहे. माझ्या पक्षाच्या बँकेत कोणतेही पैसे नाहीत. मी फक्त आदर कमावला आहे. 10 वर्षांनंतर मी सीएम पदाचा राजीनामा दिला आहे. काही काळानंतर मी मुख्यमंत्री निवास देखील सोडेन. आज माझ्याकडे दिल्लीत राहण्यासाठी घरही नाही. पण नवरात्रीच्या दरम्यान मी मुख्यमंत्री निवासस्थान सोडेल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.