Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi News: दिल्लीत आंदोलनांचा तणाव वाढला! विद्यार्थ्यांनंतर आता हजारो शेतकरी राजधानीच्या दिशेने

Delhi News: नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 21, 2026 | 11:39 AM
Delhi News (फोटो सौजन्य-सोशलमीडियावर)

Delhi News (फोटो सौजन्य-सोशलमीडियावर)

Follow Us
Follow Us:
  • देशाची राजधानीत आंदोलनांच्या केंद्रस्थानी
  • जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांचे आंदोलन
  • अनेक राज्यांतील शेतकरीही दिल्लीकडे निघाले
Punjab Farmers Head To Delhi: देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा आंदोलनांच्या केंद्रस्थानी आली आहे. काही दिवसांपासून जंतर-मंतर परिसरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच आता पंजाबसह अनेक राज्यांतील शेतकरीही दिल्लीकडे निघाले आहेत. त्यामुळे राजधानीतील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले असून प्रशासनानेही विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले आहे. या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. विद्यार्थ्यांच्या या लढ्याला अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी काही नव्या संघटनांनीही सहभाग घेतल्याने या आंदोलनाचे स्वरूप बदलताना दिसत आहे. Delhi News

CJP protest Update: पोलिसांनी विद्यार्थीनीला मारहाण केली छातीवर …! अभिजीत संतापला

अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात

मात्र, काल या आंदोलनादरम्यान परिस्थिती अचानक बिघडली. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाले. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा देशभर सुरू झाली आहे.

पंजाबमधील हजारो शेतकरी शंभू सीमेवर जमा

याचवेळी दिल्लीसमोर आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. पंजाबमधील हजारो शेतकरी शंभू सीमेवर जमा झाले असून दिल्लीकडे मोर्चा काढण्याची तयारी करत आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित असलेल्या मुक्त व्यापार कराराला त्यांचा तीव्र विरोध आहे. हा करार शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मालाला योग्य भाव मिळत नाही..

शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, हा करार लागू झाल्यास परदेशातील कृषी आणि दुग्धजन्य उत्पादने भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात येतील. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार नाही. लहान आणि मध्यम शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने हा करार तातडीने मागे घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

आता थांबायचं नाय…! आंदोलकांवरील लाठीचार्ज पाहून Sonam Wangchuk यांचा मोठा निर्णय; 23 व्या दिवशी उपोषण सुरु ठेवण्याचा मेसेज

वेगवेगळ्या राज्यातून शेतकरी सहभागी

या आंदोलनासाठी पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशातून शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. विविध शेतकरी संघटनांचे नेतेही दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी अनेक संघटना एकत्र आल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

वाहतुकीवरही निर्बंध

दुसरीकडे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. दिल्लीच्या सीमांवर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले असून संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. काही भागात वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत, तर आवश्यक यंत्रसामग्रीही सज्ज ठेवण्यात आली आहे.

सरकारकडून ठोस निर्णय मिळेपर्यंत आंदोलन

शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, सरकारकडून ठोस निर्णय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. चर्चा करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले असले, तरी मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

पडसाद देशाच्या राजकारणावर, व्यापार

दिल्लीत आधीच विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असताना आता शेतकरीही रस्त्यावर उतरल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या दोन्ही आंदोलनांचा परिणाम केवळ राजधानीपुरता मर्यादित राहणार नाही, तर त्याचे पडसाद देशाच्या राजकारणावर, व्यापार धोरणावर आणि शेती क्षेत्रावरही उमटू शकतात. त्यामुळे पुढील काही दिवसांत सरकार कोणती भूमिका घेते आणि आंदोलनाचा मार्ग कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Punjab farmers head to delhi for july 21 mahapanchayat against us trade deal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • CJP Protest
  • delhi
  • farmer

संबंधित बातम्या

CJP Protest: मुलांना घेऊन जंतर-मंतर आंदोलनात पोहोचली ‘ही’ मराठी अभिनेत्री; व्हिडिओने वेधलं लक्ष
1

CJP Protest: मुलांना घेऊन जंतर-मंतर आंदोलनात पोहोचली ‘ही’ मराठी अभिनेत्री; व्हिडिओने वेधलं लक्ष

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या
2

Travel Name : दिल्लीतील जंतर मंतर का आहे खास? येथील 4 स्तंभांचे रहस्य जाणून घ्या

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार
3

दिल्ली लाठीचार्जचे महाराष्ट्रात पडसाद; माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त एल्गार

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका
4

‘दिल्ली पोलिसांनी व्यवस्थित पुठ्ठे सुजवले…’ भाजप नेता पुन्हा बरळला, CJP आंदोलनावरून भाजपकडून जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.