Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीमध्ये राजकीय घडामोडींना वेग! पराभवानंतर युगेंद्र पवारांनी उचलले मोठे पाऊल

विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर महायुतीच्या बाजूने एकतर्फी निकाल हाती आला आहे. यानंतर आता पराभूत 11 उमेदवारांनी फेरमोजणीसाठी मागणी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 01, 2024 | 02:21 PM
10 defeated candidates from Pune district, including Yugendra Pawar, demand recount

10 defeated candidates from Pune district, including Yugendra Pawar, demand recount

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निकाल पूर्णपणे महायुतीच्या बाजूने एकतर्फी लागल्यामुळे महाविकास आघाडीने संशय व्यक्त केला आहे. ईव्हीएम मशीन हॅक आणि इतर अनेक गोष्टींवर त्यांनी संशय घेतला जात होता. बारामतीमध्ये निकालावरुन पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. युगेंद्र पवार व अजित पवार यांच्यामधील लढतीमध्ये लाखो मतांनी युगेंद्र पवार यांचा पराभव झाला आहे. त्यानंतर देखील युगेंद्र पवार यांच्यासह दहा जणांनी फेरमोजणीची मागणी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत मतमोजणीत घोळ झाल्याच्या आरोपानंतर जिल्ह्यातील तब्बल 11 मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांची पडताळणी करण्यासाठी अर्ज केला आहे. पुणे जिल्ह्यातील 11 मतदारसंघांमधील 11 पराभूत उमेदवारांमध्ये शिरूरमधील अशोक पवार, बारामतीतील युगेंद्र पवार, हडपरसमधील प्रशांत जगताप, चिंचवडमधील राहुल कलाटे, खडकवासलामधील सचिन दोडके, पर्वतीमधील अश्विनी कदम, भोसरीमधील अजित गव्हाणे, तर दौंडमधील रमेश थोरात यांचा समावेश आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंटमधील रमेश बागवे, पुरंदरमधील संजय जगताप व भोरमधील संग्राम थोपटे यांनीही अर्ज केला आहे. हा अर्ज करताना संबंधित मतदारसंघामधील एकूण मतदान केंद्रांच्या 5 टक्के केंद्रांच्या यंत्रांची पडताळणी केली जाते. ही यंत्रे उमेदवाराकडून सुचविली जातात. या मतदान केंद्रातील यंत्रांची पडताळणी करण्यासाठी प्रत्येकी 42  हजार 500  रुपये अधिक 18 टक्के जीएसटी आकारून एकूण 47 हजार 200 रुपये आकारले जातात. त्यानुसार या सर्व उमेदवारांनी 64 लाख 66 हजार 400  रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे जमा केले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या अर्जांनंतर 45 दिवसांच्या न्यायालयीन याचिकेचा कालावधी संपल्यानंतर, अर्थात 6 जानेवारीनंतर संबंधित यंत्रांमधील मतांची माहिती नष्ट केली जाईल. त्यानंतर मॉकपोलच्या आधारे 1 हजार 400 मतांची पडताळणी करून यंत्रांची सत्यता पडताळली जाईल, असे जिल्हा निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेरमतमोजणी व्हावी यासाठी न्यायालयात जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतमोजणीवेळी एखाद्या उमेदवाराने दोन तासांच्या आत आक्षेप घेतल्यास फेरमतमोजणी घेण्यात येते. त्यानंतर आक्षेप आल्यास व उमेदवार न्यायालयात गेल्यास फेरमतमोजणी घेण्यात येते. त्यासाठी सर्व मतदान यंत्रांमधील मतांची माहिती (डेटा) ४५ दिवसांसाठी सुरक्षित ठेवला जातो. मात्र, त्यानंतर मतदान यंत्रांच्या सत्यता पडताळणीबाबत आक्षेप आल्यास न्यायालयीन प्रक्रियेसाठी राखून ठेवलेल्या 45 दिवसांनंतर संबंधित मतदान यंत्रांमधील माहिती नष्ट करून नवे चिन्ह टाकून १ हजार ४०० मते टाकून मॉकपोल घेतला जातो. त्यात व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. त्यात कोणत्या चिन्हाला किती मते मिळाली याची पडताळणी केली जाते.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

न्यायालयीन प्रक्रियेचा ४५ दिवसांचा कालावधी येत्या ६ जानेवारीला संपत आहे. त्यामुळे ही पडताळणी त्यानंतरच होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उमेदवारांचा पडताळणीसाठी अर्ज आल्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला कळविण्यात येते. त्यानंतर या कार्यालयाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घेतली जाते. पडताळणी वेळी आयोगाकडून यंत्र उत्पादक कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल लि.च्या अभियंत्यांचे पथक, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे पथक व प्रत्यक्ष उमेदवाराच्या उपस्थितीत ही पडताळणी केली जाते.

उमेदवार मतदारसंघ यंत्रांची संख्या भरलेले शुल्क

अशोक पवार (12 शिरूर मतदारसंघ ) ५, ६६. ४०० रुपये

प्रशांत जगताप ( 27  हडपसर मतदारसंघ ) १२, ७४,४०० रुपये

रमेश बागवे (09 पुणे कॅन्टोन्मेंट ) ४,२४,८०० रुपये

राहुल कलाटे (25 चिंचवड) ११, ८०, ००० रुपये

सचिन दोडके (02 खडकवासला) ९४, ४०० रुपये

युगेंद्र पवार (19 बारामती)  ८,९६,८०० रुपये

अश्विनी कदम ( 02 पर्वती) ९४, ४०० रुपये

अजित गव्हाणे (10 भोसरी) ४,७२,००० रुपये

संजय जगताप (21 पुरंदर) ९,९१,२०० रुपये

संग्राम थोपटे (06 भोर) २,८३,२०० रुपये

रमेश थोरात (04 दौंड) १,८८,८०० रुपये

एकूण ११ उमेदवारांनी ६४ लाख ६६ हजार ४०० रुपये भरले आहेत.

Web Title: 10 defeated candidates from pune district including yugendra pawar demand recount

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2024 | 02:21 PM

Topics:  

  • cm of maharashtra
  • Eknath Shinde
  • maharashtra election 2024

संबंधित बातम्या

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…
1

Eknath Shinde News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेचे सूचक विधान; म्हणाले…

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले
2

Eknath Shinde On Thackeray: “हे तर कारस्थान करणारे…”; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना धू-धू धुतले

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
3

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
4

Uddhav Thackeray Live : “शिवाजी पार्कवर चिखल, याला कारण कमळाबाई…”, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.