Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न; अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर मविआचा गंभीर आरोप

अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 19, 2024 | 11:55 AM
Attempts to create riots in Maharashtra before elections

Attempts to create riots in Maharashtra before elections

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तोफ थंडावली आहे. आता सर्व राजकीय पक्षांचा आणि नेत्यांचा जीव टांगणीला लागला आहे. मतदारांचा कौल कोणाच्या पदरात पडणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. उद्या (दि.19) मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या झालेल्या हल्ल्यामुळे देखील त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करुन भाजपवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. या संदर्भात खासदार संजय राऊत म्हणाले की, “अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करणाऱ्या लोकांनी त्यांना दगडफेक करत अक्षरशः रक्तबंबाळ केले. हा हल्ला करताना हल्लेखोरांनी भाजप पक्षाच्या बाजूने जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. राज्याच्या माजी गृहमंत्र्यांवर ठार मारण्याच्या दृष्टीने हल्ला होतो. बाबा सिद्दीकींची हत्या होते. या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे आहेत. याला जबाबदार शिंदे सरकार आहे. आता निवडणूक आयोगाकडे राज्याची सर्व सूत्र आहेत तरीही गृहमंत्र्यांचा हुकूम चालतो. कारण निवडणूक आयोग त्यांच्याच हातामध्ये असून त्यांच्या माणसांना धरुन काम करत आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

संजय राऊत म्हणाले की, “उद्या मतदान आहे त्यापूर्वी विरोधी पक्षाच्या किती नेत्यांना धमक्या येतील हे सांगता येत नाही. किती कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर हल्ले होतील हे सांगता येत नाही. खोटे गुन्हे दाखल केले जातील. नरेंद्र मोदी यांच्याकडून आम्ही स्टंटबाजी करायला शिकलो नाही. याची आम्हाला गरज देखील नाही. नेत्यांवर हल्ला करण्याची ही भाजपची जी महाराष्ट्रामध्ये नौटंकी सुरु आहे ही यापूर्वी कधीही नव्हती. महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी असे वातावरण नव्हते. ते देवेंद्र फडणवीस व अमित शाह यांच्याकाळामध्ये झालं आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहे तर महाराष्ट्रात नेत्यांवर हल्ला होत आहे. काय यांच्या हातामध्ये कायदा व सुव्यवस्था सुरक्षित राहणार आहे” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुढे संजय राऊत म्हणाले की, “मतदानांच्या पूर्वसंध्येला भाजपला राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत. भाजपची आजची जाहिरात पाहा त्यावरुनच हे लक्षात येईल. व्होट जिहाद वैगरे हे सगळं आता थांबेल. हे आता अशा पातळीवर आले आहेत की त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. पण आम्ही असं दंगे होऊ देणार नाही,” असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी मतदानदिनाच्यापूर्वी केला आहे.

 

Web Title: Attempts to create riots in maharashtra before vidhansabha elections voting 2024 sanjay raut accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 11:55 AM

Topics:  

  • anil deshmukh
  • Maharashtra Assembly election 2024
  • narendra modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
1

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी
2

परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर मॉस्को दौऱ्यावर; २६ व्या भारत-रशिया सहकार्य बैठकीत होणार सहभागी

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
3

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा
4

पंतप्रधान मोदींनी सांगितला आत्मनिर्भरतेचा मूलमंत्र; शेती, संरक्षण अन् टेक्नोलॉजी क्षेत्राकडून व्यक्त केल्या अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.