Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय राऊतांच्या दाव्यानंतर बावनकुळेंचं मोठं विधान; ‘2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री

मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी मोशी दुर्घटनेवरील विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिले.

  • By विवेक
Updated On: Jul 11, 2026 | 08:39 PM
'रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका'; 'सावजी'वरून बावनकुळे आक्रमक

'रेस्टॉरंट्स बंद पडतील अशी वक्तव्ये करू नका'; 'सावजी'वरून बावनकुळे आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • संजय राऊतांच्या वक्तव्याला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, असा दावा केला
  • ’14 कोटी जनतेची इच्छा फडणवीसच मुख्यमंत्री राहावेत’, असे बावनकुळे म्हणाले
  • मोशी दुर्घटनेवरील विरोधकांचे आरोप फेटाळत सरकार युद्धपातळीवर बचावकार्य करत असल्याचा दावा
 

शिवसेना ठाकरे गटचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यास चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे वक्तव्य केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

बावनकुळे म्हणाले की, “महाराष्ट्रात 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री राहतील. राज्याला फडणवीस यांच्यासारखे अष्टपैलू नेतृत्व लाभावे, ही 14 कोटी जनतेची भावना आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

‘कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अन् मुख्यमंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये…’मोशी दुर्घटनेवरून हर्षवर्धन सपकाळ यांचा फडणवीसांवर निशाणा

संजय राऊतांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी फडणवीसांनी 2029 पूर्वी केंद्रात जाऊन देशाच्या नेतृत्वात भूमिका घ्यावी आणि त्यांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होऊ शकतात, असे म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही शक्यता फेटाळत फडणवीसच दीर्घकाळ राज्याचे नेतृत्व करतील, असा दावा केला.

मोशी दुर्घटनेवरील आरोपांना उत्तर

पिंपरी-चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनेनंतर विरोधकांनी सरकारच्या बचावकार्यावर टीका केली होती. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आरोप करणे हे विरोधकांचे काम आहे, मात्र सरकार, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महानगरपालिका, पोलीस आणि इतर सर्व विभाग युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत.

ते म्हणाले की, सरकारचे संपूर्ण लक्ष अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे आणि आवश्यक ती मदत पोहोचवण्यावर केंद्रित आहे.

‘MPSC भरती घोटाळा व्यापमपेक्षाही मोठा’; हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर गंभीर आरोप, ऑनलाइन परीक्षा रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

‘देशात देवा भाऊ, महाराष्ट्रात शिंदे साहेब’, बच्चू कडूंचे मोठे विधान

बच्चू कडू म्हणाले की, “महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला राज्यातील नेता देशाचं नेतृत्व करताना पाहायचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्तेत आली. त्यामुळे केवळ संख्याबळ नव्हे तर नैतिकतेच्या आधारावर फडणवीस दिल्लीला गेल्यास मुख्यमंत्रीपद शिंदेंनाच मिळायला हवे.”

बच्चू कडू म्हणाले, “देवा भाऊंनी निश्चितच दिल्लीची तयारी करावी आणि देशाची सूत्रे हाती घ्यावीत. महाराष्ट्रात शिंदे साहेबांनी नेतृत्व करावं. देशात देवा भाऊ आणि महाराष्ट्रात शिंदे साहेब असा प्रवास झाला पाहिजे.”

Web Title: Chandrashekhar bawankule on devendra fadnavis chief minister 2034

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Chandrashekhar Bavankule
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
1

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
3

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
4

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.