हरियाणा विधानसभा निवडणूकीतील निकालावर भाजपाचे पूर्व खासदार बृजभूषण शरण सिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिंग म्हणाले की, ज्या पध्दतीने शेतकऱ्यांच्या नावावर, पैलवानांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याला जनतेने नाकारले आहे. या प्रतिक्रेयेसोबतच सिंग यांनी विनेश फोगटच्या विजयावर म्हटले की, भले ती जिंकली मात्र कॉंग्रेस चा तर सत्यानाश झाला.
त्यांना विचारण्यात आले की कॉंग्रेसचा कोणामुळे सत्यानाश झाला? त्यावेळी बृजभूषण यांनी नाव न घेता विनेश फोगाट कड इशारा केला. ते म्हणाले हे जिंकणारे पैल्लवान नायक नाही तर खलनायक आहे.
विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि अनेक पैल्लवानांनी बृजभूषण शरण सिंग यांच्यावर ज्युनिअर महिला कुस्तीपटूंवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या विनेशसह सर्व कुस्तीपटूंनी दिल्लीतील जंतर मंतरवर विरोध प्रदर्शन केले होते. कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपामुळे भारतीय कुस्ती जगतात खळबळ उडाली होती. त्यामुळे लोकसभा निवडणूकीमध्ये बृजभूषण सिंग यांना तिकीट नाकारण्यात आले त्यांच्याएवजी त्यांच्या मुलाला तिकीट दिले गेले. बृजभूषण सिंग यांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण कोर्टात सुरु आहे.
6 हजारहून जास्त मताधिक्क्यांनी विजय
विनेश फोगाट ने जुलाना विधानसभेतून विजय मिळविला आहे. सुरुवातीच्या कलामध्ये विनेश पिछाडीवर होती मात्र त्यानंतर मताधिक्क्य घेत भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा 6 हजारहून जास्त मताधिक्क्यांनी पराभव केला. विनेशची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे विनेश पहिल्यांदाच आमदार झाली आहे. मात्र त्यांचा पक्ष कॉंग्रेस हा सत्तेपासून दुर राहताना दिसत आहे. भाजप सध्या 50 जागांवर आघाडीवर (त्यातील काही आमदार जिंकले आहेत) असून कॉंग्रेसचे केवळ 34 आमदार आघाडीवर आहेत. (त्यातील काही आमदार जिंकले आहेत) त्यामुळे भाजप सत्तास्थापन करेल हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
2024 च्या निवडणूकीतील पराभव हा कॉंग्रेससाठी धक्का असणार आहे. कारण कॉंग्रेससाठी राज्यात सकारात्मक वातावरण असल्याचे चित्र दिसत होते. अनेक भाजप नेत्यांनीही कॉंग्रेसचा हात हातात घेतला होता. शेतकरी आंदोलनामुळेही सरकारच्या विरोधात वातावरण जाईल असे बोलले जात होते मात्र भाजपने कमाल करत सत्ता पुन्हा खेचून आणली आहे.