Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकच जल्लोष अन् आनंद! पुन्हा मुख्यमंत्री होणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर नेत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

विधानसभा निवडणुकीनंतर आता महायुतीने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 04, 2024 | 05:46 PM
राज्यात लवकरच अत्याधुनिक कारागृहे उभारणार, कारागृह-सुधार विधेयक मंजूर; मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यात लवकरच अत्याधुनिक कारागृहे उभारणार, कारागृह-सुधार विधेयक मंजूर; मुख्यमंत्र्यांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये अखेर महायुतीने सत्तास्थापनेचा दावा केलेला आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांसह राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनचे दावा केला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. उद्या आझाद मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामुळे भाजपच्या सर्व नेत्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषपूर्ण वातावरण आहे.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्यानंतर मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार आहे हे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र भाजप देवेंद्र फडणवीसांना पुन्हा संधी देणार की धक्कातंत्र वापरुन नवीन चेहऱ्याला संधी देणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यामुळे आता फडणवीस हेच महायुतीचे नेतृत्व करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

देंवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेते पदी निवड झाल्यानंतर सर्व मित्रपक्षांच्या नेत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. नितीन गडकरी यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर पोस्ट करुन कौतुक व शुभेच्छा दिल्या आहेत. नितीन गडकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीसजी यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल, असा मला विश्वास आहे, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल श्री @Dev_Fadnavis जी यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती मिळेल, असा मला विश्वास आहे. — Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 4, 2024

त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. बावनकुळे यांनी लिहिले आहे की, अभिनंदन देवेंद्रजी! भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या व तत्पूर्वी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन, अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी, सर्व बंधू भगिनींचे लाडके देवा भाऊ अर्थातच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात व पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात भाजपने विधानसभा निवडणुका लढवल्या. या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत प्राप्त झाले. उद्याचा शपथविधीचा दिवस म्हणजे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचे व राज्यातील लाखो कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आहे. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आजचा हा क्षण अतिशय आनंददायी व हर्षोल्हास साजरा करण्याचा क्षण आहे, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

अभिनंदन देवेंद्रजी! भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाच्या व तत्पूर्वी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन, अष्टपैलू कर्तुत्वाचे धनी, सर्व बंधू भगिनींचे लाडके देवा भाऊ अर्थातच भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय @Dev_Fadnavis जी यांची विधिमंडळ… pic.twitter.com/UNOUrgrx44 — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) December 4, 2024

 

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

त्यांच्या मुख्यमंत्री निवडीचा आनंद

भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. गंगाधरराव फडणवीस यांच्यासोबत भाजपच्या कार्यालयात येणारा देवेंद्र फडणवीस राज्याचा पुन्हा मुख्यमंत्री होत असल्यामुळे आम्हाला जास्त आनंद आहे. संघाचा स्वयंसेवक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चा, नगरसेवक, महापौर, आमदार , मुख्यमंत्री अशी सर्व कारकीर्द त्यांची बघितली आहे. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री निवडीचा आनंद आहे, अशा शब्दांत आनंदराव ठवरे यांनी कौतुक केले.

Web Title: Congratulations on devendra fadnavis appointment bjp new cm of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 05:38 PM

Topics:  

  • BJP
  • cm of maharashtra
  • devendra fadnavis
  • Maharashtra CM

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
2

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
3

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात
4

Bihar Politics: नितीश कुमारांच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; बड्या नेत्याची खुर्ची धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.