Photo Credit- Social Media Eknath Shinde News: उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही? एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले....
मुंबई: महायुतीच्या विधीमंडळाच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्याचवेळी सर्वांनी एकमताने मुख्यमंत्रिपदासाठीही त्यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आज दुपारी अडीच्या सुमारास देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या सह महायुतीतील काही नेते राजभवनावर दाखल झाले. तीनही नेत्यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला.. सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबतच एकनाथ शिंदे यांनीही आपली प्रतिक्रीया दिली.
यावेळी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात ते शपथ घेणार का, असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, धीर धरा, संध्याकाळपर्यंत सांगू, असं सांगत त्यांनी उत्तर देणं टाळलं. पण त्याचवेळी मी शपथ घेणार असल्याचे अजित पवार यांनी सांगताच तिघेही हसू लागले. उद्याच्या शपथविधी सोहळ्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपत घेणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
डिसेंबर महिन्यात लाँच होणार Realme चा स्मार्टफोन, बजेट किंमतीत मिळणार Cool
आमच्या सरकारने अडीच वर्षात केलेले काम उल्लेखनीय आहे याचा मला खूप आनंद होत आहे. हे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले की, उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. तसेच, उद्यााच्या शपथविधीनंतर खातेवाटपानंतर इतर मंत्र्यांच्या शपथविधी होईल. असे उदय सामंत म्हणाले. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करावे, अशी शिवसेना कार्यकर्ते, आमदार आणि खासदारांची इच्छा आहे. एकनाथ शिंदे बहुधा यासाठी उत्सुक नसल्याचं त्यांनी यावेळी सूचित केलं. माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. फडणवीस, शिंदे आणि अजित पवार मंत्रिमंडळ स्थापनेबाबत आणि विभागांच्या विभाजनाबाबत निर्णय घेतील. असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिदेत बोलताना फडणवीस म्हणाले, ‘राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंतर पाच तारखेला संध्याकाळी पाच तारखेला शपथविधीची वेळ दिली आहे. भाजप, शिंदे गट, अजित पवार गट, जनसुराज्य, पक्ष रासप आणि इतर मित्रपक्ष अशी महायुती झाली आहे. या सर्वांच्या सहीचे पत्र आम्ही दिलेले आहे. एकनाथ शिंदे यांनी माझ्या समर्थनार्थ पत्र दिले. महायुतीकडून माझा मुख्यमंत्रीपदी शपथविधी करावा, अशी विनंती त्यांनी राज्यपालांकडे केली आहे. अजित पवार यांनीदेखील त्याच आशयाचे पत्र राज्यपालांकडे दिले आहे. या सर्वांच्या विनंतीचा मान ठेवून राज्यपालांनी आम्हाला निमंत्रित केलं आहे.
भयंकर! अचानक बस उलटली अन्…; अपघातात महिलेच्या हुशारीने चिमुकल्याचा जीव वाचला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आझाद मैदानावर हा सोहळा पार पडेल. उद्या किती लोकांचा शपथविधी होईल याची माहिती संध्याकाळी दिली जाईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद ही आमच्यासाठी टेक्निकल अरेंजमेंट आहे. यापुढे आम्ही तिघेही एकत्रितरित्या सरकार चालवणार आहोत. आम्ही तिघेही आणि आमच्या पक्षांतील इतर नेते एकत्रितपणे चांगले आणि स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू, आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे प्रयत्न करत राहू.