Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंना आज द्यावा लागणार मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा? कारणही आलं समोर…

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदे गटाने इच्छा व्यक्त केली आहे. भाजपने 'बिहार पॅटर्न' महाराष्ट्रात राबवावा, असे खासदार नरेश म्हस्के यांनी मत व्यक्त केले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 26, 2024 | 07:52 AM
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; पुण्यातील बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; पुण्यातील बडा नेता धनुष्यबाण हाती घेणार

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार गट)-शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला असून, महायुतीला चांगले यश मिळाले आहे. आता मुख्यमंत्रिपदावरून भाजप आणि शिवसेनेत चढाओढ सुरु आहे. असे असताना विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेदेखील वाचा : अखेर ठरलं ! राज्यातील ‘या’ बड्या नेत्याला मिळणार मुख्यमंत्रिपद; भाजपच्या बैठकीत झालं एकमत

विधानसभेची रीतसर स्थापना झाल्यानंतर आता उत्सुकता नवीन सरकारच्या शपथविधीची आहे. तत्पूर्वी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मावळत्या विधानसभेची मुदत आज (दि.26) अखेरीपर्यंत आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला व मंत्रिमंडळाचा राजीनामा देतील. याबाबत घटनेची तरतूद नव्या विधानसभेची स्थापना होताना जुन्या सरकारचा राजीनामा यावा, अशी असली तरी आधी सत्तेत असणाऱ्या महायुतीलाच नवीन सरकार स्थापन करायचे आहे. त्यामुळे या स्थितीत एखादा दिवस पुढे जाऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे.

याशिवाय मावळत्या विधानसभेची मुदत मंगळवारपर्यंत असल्याने घटनात्मक पेचाचा मुद्दा उभा राहणार नाही, असे घटनातज्ज्ञ डॉ. अनंत कळसे यांनी सांगितले. जेव्हा निकाल विद्यमान सरकारी पक्षाच्या विरोधात जातो, तेव्हा मावळते मुख्यमंत्री निकाल लागल्याबरोबर लगेच राजभवनावर जाऊन पदाचा व मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर करतात.

महाराष्ट्रात सध्या परिस्थिती उलट

याबाबत नियमावली जरी असली तरी सध्या महाराष्ट्रात परिस्थिती उलट स्थिती असल्याने थोडा वेळ एकनाथ शिंदे घेऊ शकतात. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा होतो तेव्हा राज्यपाल त्यांना पुढची व्यवस्था होईपर्यंत कारभार पाहा, असे सांगतात. नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री राहतात.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी राहावे; शिंदे गटाची मागणी

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदे गटाने इच्छा व्यक्त केली आहे. भाजपने ‘बिहार पॅटर्न’ महाराष्ट्रात राबवावा, असे खासदार नरेश म्हस्के यांनी मत व्यक्त केले आहे. तर मराठा आरक्षणाचा प्रश्न एकनाथ शिंदेच सोडवू शकतात, त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करावे, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्ता शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Elections 2024 : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की शिंदे राहणार? आता महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात येणार?

Web Title: Eknath shinde may have to resign from the post of chief minister today nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 07:52 AM

Topics:  

  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला, मुख्यमंत्र्यांचा ‘शब्द’ की बंडखोरी पूर्ण होणार?
1

Maharashtra Politics : नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला, मुख्यमंत्र्यांचा ‘शब्द’ की बंडखोरी पूर्ण होणार?

कोकणच्या जागेवरून नवा ट्विस्ट ! एकनाथ शिंदे आधी म्हणाले ‘युतीधर्म पाळा’, आता दिल्या अर्ज मागे न घेण्याच्या सूचना
2

कोकणच्या जागेवरून नवा ट्विस्ट ! एकनाथ शिंदे आधी म्हणाले ‘युतीधर्म पाळा’, आता दिल्या अर्ज मागे न घेण्याच्या सूचना

शिवसैनिकांचा उदय सामंतांकडे जोरदार आग्रह; ‘या’ नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी
3

शिवसैनिकांचा उदय सामंतांकडे जोरदार आग्रह; ‘या’ नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी देण्याची मागणी

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?
4

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जिवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.