
फोटो सौजन्य सोशल मीडिया
पात्र शेतकऱ्यांना योजनांच्या लाभापासून वंचित ठेवू नये, अशी भूमिकाही शिवसेना शिंदे गटाच्या उभय नेत्यांनी मांडली.अहिल्यादेवी होळकर योजनेबाबत बोलताना बच्चू कडू यांनी गरीब शेतकऱ्यांना अधिक मदत मिळण्याची गरज व्यक्त केली. शेतकरी कर्जमाफीच्या वेळीही आपण ही भूमिका मांडली होती, असे ते म्हणाले.
आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. मात्र, एखाद्या पात्र शेतकऱ्याचे नाव चुकीने वगळले गेले असल्यास त्याची दखल घेऊन कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिकूल परिस्थितीतही शिवसेनेने काम केले असून, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे नेतृत्व पक्षाकडे आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्व आणि पश्चिम विदर्भात पक्षाचा विस्तार करण्यावर विशेष भर दिला जात आहे. गावागावांत शिवसेना पोहोचवून महाराष्ट्रातील इतर भागांप्रमाणे विदर्भातही पक्षाची ताकद वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे आशिष जयस्वाल व बच्चू कडू यांनी सांगितले.
संघटन बांधणीबाबत पूर्व विदर्भातील प्रमुखय पदाधिकाऱ्याची प्रेस क्लबमध्ये बैठक झाली. एकनाथ शिंदे यांचे विदर्भाकडे सातत्याने लक्ष असून, विदर्भाला विधान परिषदेचे चार आमदार मिळाले आहेत. विदर्भातील जनतेनेही शिंदे यांच्या नेतृत्वाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन बच्चू कडू व आशिष जयस्वाल यांनी केले.
व्हायरल अमरावतीतील व्हिडीओबाबत बोलताना बच्चू कडू यांनी हा विषय अंतर्गत बैठकीतील दुर्गामातेच्या प्रसादासंदर्भातील असल्याचा दावा केला. माध्यमांनी त्याचा वेगळा अर्थ लावून प्रसादाबाबत चुकीचे चित्र निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.
Court Decision : अविवाहित मुलीलाही पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा निर्वाळा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील कथित नाराजीबाबत बोलताना उभय नेत्यांनी सावध भूमिका घेतली. दोन्ही मोठे नेते असून, त्यांच्याबाबत आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. दोघांमधील नाराजी केवळ दूरचित्रवाणीवर दिसते,असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे सांगत महायुतीमध्ये मात्र अशी स्पर्धा नसल्याचा दावाही कडू यांनी केला. पुणे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याच्या विषयावर विदर्भातील नेते भाष्य करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.