Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली: धारावीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका; म्हणाले, “आमचे सरकार आल्यास…”

काँग्रेस व महाविकास आघाडीतर्फे बुधवारी प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आजच्या स्वाभिमान सभेत विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून पंचसुत्री जाहीर करण्यात आली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 06, 2024 | 08:42 PM
उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली: धारावीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका; म्हणाले, "आमचे सरकार आल्यास..."

उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली: धारावीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका; म्हणाले, "आमचे सरकार आल्यास..."

Follow Us
Follow Us:

मुंबई: काँग्रेस व महाविकास आघाडीतर्फे बुधवारी प्रचाराचे रणशिंग फुंकण्यात आले आहे. मुंबई येथील वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात ‘मविआ’ची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभेला’ सुरुवात झाली आहे.  या स्वाभिमान सभेत विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून पंचसुत्री जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आजच्या सभेत कॉँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित केले. यावेळेस उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि आता निवडणुकांचे फटाके फुटू लागले आहेत. आपल्याकडे चांगले ॲटम बॉम्ब आहेत. तर पलीकडून फुलबाज्या सुरू आहेत. मात्र २३ तारखेला आपल्याला विजयाचे फटाके फोडायचे आहेत. सध्या महागाई इतकी वाढली आहे की अनेक घरांमध्ये फरलचे पदार्थच गायब झाले आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना आपण आपल्या 5 जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवले होते. आनंदाच्या शीधेमधून उंदराच्या लेंडया देते हा आहे का तुमचा आनंद?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आपले सरकार आल्यानंतर ५  जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे इतके टॅक्स लावत आहेत. कदाचित उद्या श्वास घ्यायला देखील टॅक्स लावतील. शेतकऱ्यांचे ३  लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार असे पवारांनी सांगितले. आम्ही हवेतल्या बाता करत नाही. आम्ही जे करतो तेच बोलतो आणि जे बोलतो तेच करतो. जसे राज्यातील मुलींना मोफत शिक्षण दिले जात आहे, तसेच आमचे सरकार आल्यास मुलांना देखील मोफत शिक्षण देणार आहोत. बेरोजगारांना 4 हजार रुपयांची मदत करणार आहोत. ”

“आपली धारावी नव्हे तर संपूर्ण मुंबई अदाणीच्या घशात घालणारी जिआर निघाले. हे जीआर फेक नरेटीव्ह असतील तर? एक धारावी वसवण्यासाठी मुंबईतील २० जागा अडाणीच्या घशात घातल्या जात आहेत. म्हणजे मुंबई संपूर्णपणे अदाणीमय करून टाकायची आहे की काय? आमचे सरकार आल्यास या निविदा आम्ही रद्द करू. तसेच धारावीकरांना तिथल्या तिथे उद्योग आणि घरे दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही,” असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हेही वाचा: शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी, महिलांना महिन्याला 3 हजार देणार…; विधानसभेसाठी मविआकडून पंचसुत्री जाहीर!

पंचसूत्री जाहीर

– राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देणार तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार.
– युवकांना प्रतिमहिना ४ हजार रुपये देणार.
– कुटूंब रक्षण योजनेत २५ लाखांपर्यंत आरोग्य विमा व मोफत औषधे देणार.
– महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास.
– जातनिहाय जनगणना करणार, 50 टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील.

Web Title: Mva election rally uddhav thackeray present manifesto bkc mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 08:29 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mumbai
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड
1

MMRDA News: कोपरी पुलावर काळजाचा ठोका चुकवणारी घटना! कारवर कोसळल्या लोखंडी सळ्या; MMRDA ने ठोठावला २ कोटींचा दंड

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
2

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
3

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
4

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.