येत्या 27 तारखेला शिवाजी पार्कवर एकत्र या! राज ठाकरेंनी दिले आदेश, काय घोषणा करणार?
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. अवघ्या आठवड्याभरामध्ये प्रचार थांबणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीसह इतर पक्ष देखील जोरदार प्रचार करत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष देखील ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. मनसेकडून राज्यभरातील अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार देण्यात आला आहे. मात्र राज्यामध्ये कधीच राज ठाकरेंची सत्ताही कधी येणार नाही अशी राजकीय भविष्यवाणी करण्यात आली आहे. भाजपच्या मित्रपक्षाने ही भविष्यवाणी केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभरामध्ये राज ठाकरेंच्या या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. नुकतीच त्यांची अमरावतीमध्ये पप्पू उर्फ मंगेश पाटील यांच्यासाठी देखील प्रचार सभा पार पडली. अमरावतीमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हाती सत्ता दिली तर एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी या सभेदरम्यान केले होते. या वक्तव्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) प्रमुख रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना यावरुन खडेबोल सुनावले आहेत. तसेच राज ठाकरेंच्या सत्तेबाबत भविष्यवाणी केली आहे.
रामदास आठवले यांनी एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “राज ठाकरे वारंवार अशाप्रकारचे विधान करत असतात. आमचे सरकार आले तर मशिदीवरील भोंगे हटविणार असे ते म्हणतात. पण मशिदीवरील भोंगे हटणार नाहीत आणि राज ठाकरेंची सत्ताही कधी येऊ शकत नाही. कितीही वर्ष गेले तरी राज ठाकरेंची सत्ता येऊ शकत नाही. त्यांचा एकच आमदार निवडून येतो, तोही स्वतःच्या जीवावर. मग त्यांचे सरकार कसे येणार? आणि ते कसे भोंगे हटवू शकणार?” असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन अधिकृत उमेदवार ! पनवेलमध्ये रंगतेय अजब राजकारण
पुढे रामदास आठवले म्हणाले की, “मी दहशतवादी असलेल्या मुसलमानांचा नेहमीच विरोध केला आहे. पण देशावर, भारताच्या संविधानांवर प्रेम करणारे आणि हिंदूंशी बंधुभाव राखून राहणाऱ्या मुसलमानांचा विरोध करणे ठीक नाही. मशिदीत एक-दोन मिनिटांची अजान होत असते, त्यासाठी भोंगे हटविण्याची काय गरज आहे. भोंगे हटविण्यापेक्षा गरीबी हटवा, भ्रष्टाचार हटवा, भोंगे हटविण्यापेक्षा विषमता, जातीयता हटविली पाहीजे. केवळ 140 – 145 उमेदवार उभे करून आमदार निवडून येत नसतात. मनसेचे दोनही आमदार निवडून येणार नाहीत. पण राज ठाकरे असे विधान वारंवार करत राहिले, तर माझा पक्ष भोंगे हटविणाऱ्यांना धडा शिकवल्या राहणार नाही,” असा खोचक टोला रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.