Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 Idiots Sequel: ‘3 इडियट्स’च्या सीक्वलवर राजकुमार हिरानींची मोठी अपडेट; आमिर खानसह जुनी स्टारकास्टच दिसणार का?

3 Idiots Sequel: ‘3 इडियट्स’च्या सीक्वलवर राजकुमार हिरानी यांनी मोठी अपडेट दिली आहे. आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी पुन्हा दिसणार असून स्क्रिप्टवर काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 02, 2026 | 10:17 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘3 इडियट्स’च्या सीक्वलवर काम सुरू
  • आमिर खान, माधवन आणि शर्मन जोशी पुन्हा एकत्र
  • स्क्रिप्ट परफेक्ट झाल्यावरच बनणार सिनेमा
3 Idiots Sequel: 3 इडियट्स’ हा हिंदी सिनेसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांनी साकारलेल्या रँचो, फरहान आणि राजू या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर आजही छाप कायम ठेवली आहे. आता या तिघांची मैत्री आणि कथा पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ‘3 इडियट्स’च्या सीक्वलबाबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी मोठी अपडेट दिली आहे.

‘3 इडियट्स’चा सीक्वल तयार होतोय!

‘3 इडियट्स’चा सीक्वल तयार करण्याच्या दिशेने काम सुरू असल्याचं राजकुमार हिरानी यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, चित्रपटाबाबत आत्ताच फारसे तपशील समोर आणण्याची त्यांची इच्छा नाही. एएनआयशी बोलताना हिरानी यांनी सांगितलं की, टीम या प्रोजेक्टवर काम करत आहे आणि योग्य टप्प्यावर पोहोचल्यानंतरच त्याबाबत अधिकृतपणे चर्चा केली जाईल.

विशेष म्हणजे, सीक्वलसाठी मूळ कलाकारच कायम राहणार असल्याचं हिरानी यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी पुन्हा अनुक्रमे रँचो, फरहान आणि राजूच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता निश्चित झाली आहे.

‘स्क्रिप्ट परफेक्ट झाली तरच चित्रपट बनवणार’

सीक्वलबाबत उत्सुकता असली तरी राजकुमार हिरानी घाई करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. सध्या चित्रपटाचं काम लेखनाच्या टप्प्यावर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

हिरानी यांच्या मते, ‘3 इडियट्स’ला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. त्यामुळे त्याच दर्जाची कथा तयार झाली तरच सीक्वल पुढे नेला जाईल. स्क्रिप्ट परिपूर्ण झाल्याशिवाय चित्रपट बनवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

त्यामुळे केवळ पहिल्या भागाच्या यशाचा फायदा घेण्यासाठी सीक्वल बनवण्याऐवजी, प्रेक्षकांच्या अपेक्षांना न्याय देणारी कथा तयार करण्यावर निर्मात्यांचा भर असल्याचं दिसत आहे.

मूळ कलाकारच करणार पुनरागमन

राजकुमार हिरानी यांनी ‘कलाकार तेच राहतील’ असं स्पष्ट केल्यामुळे आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब झालं आहे. मात्र, सीक्वलमध्ये इतर कोणते कलाकार असतील किंवा जुन्या पात्रांची कथा नेमकी कुठून पुढे सुरू होईल, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पहिल्या भागात करीना कपूर, बोमन इराणी आणि ओमी वैद्य यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे सीक्वलमध्ये या कलाकारांपैकी कोण पुन्हा दिसणार, याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.

Madhuri Pawar: ‘कोण करतंय, का करतंय काहीच..’, गेल्या ३ वर्षांपासून माधुरी पवारला होतोय त्रास; केला धक्कादायक खुलासा

२००९ मध्ये प्रदर्शित झाला होता ‘3 इडियट्स’

राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘3 इडियट्स’ २००९ साली प्रदर्शित झाला होता. चेतन भगत यांच्या ‘Five Point Someone’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटात शिक्षणव्यवस्था, मैत्री, करिअर आणि विद्यार्थ्यांवरील अपेक्षांचा वेध घेण्यात आला होता.

आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांच्या अभिनयासोबतच करीना कपूर, बोमन इराणी आणि ओमी वैद्य यांच्या व्यक्तिरेखाही लोकप्रिय ठरल्या.

बॉक्स ऑफिसवरही केला होता विक्रम

माध्यमांच्या वृत्तानुसार, ‘3 इडियट्स’चं बजेट सुमारे ५५ कोटी रुपये होतं. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अंदाजे २७४ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला.

आता तब्बल अनेक वर्षांनंतर रँचो, राजू आणि फरहान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार असल्याची बातमी समोर आल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, सीक्वलची अधिकृत रिलीज डेट आणि कथानकाबाबतची माहिती निर्मात्यांकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Hunkar The Roar: १७ वर्षांच्या मुलीच्या एका आरोपाने हादरली शक्तिशाली व्यवस्था; ‘हुंकार: द रोअर’चा थरारक टीझर!

Web Title: 3 idiots sequel rajkumar hirani aamir khan r madhavan sharman joshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • Aamir Khan
  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
1

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली
2

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली

Sheetal Upare Bollywood Entry:  मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
3

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Darshan Raval New Song: पहिलं प्रेम, जुन्या आठवणी अन् पुन्हा भेटण्याची ओढ! ‘पहला प्यार दूसरी बार’चं ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज
4

Darshan Raval New Song: पहिलं प्रेम, जुन्या आठवणी अन् पुन्हा भेटण्याची ओढ! ‘पहला प्यार दूसरी बार’चं ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.